‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता समीर परांजपे झाला बाबा, नुकतेच घरी झाले चिमुकलीचे आगमन


आता सुरु झालेले २०२१ हे नवीन वर्ष सर्वांसाठीच खासकरून मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूपच खास आणि आनंदायी ठरत आहे. २०२० या त्रासदायक वर्षामुळे सर्वांमध्येच खूप नकारात्मकता निर्माण झाली होती. शिवाय २०२० मध्ये अनेक वाईट गोष्टी घडत होत्या, मात्र २०२१ सुरु झाले आणि सकारात्मकता आणि आनंद सर्वांच्याच जीवनात आला.
एकीकडे अनेक कलाकारांचे लग्न या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर होत असताना दुसरीकडे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अभिनेता बाबा झाला आहे. हो, कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा हँडसम अभिनेता समीर परांजपेला मुलगी झाली आहे.

समीरच्या पत्नीने ही गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली आहे. अनुजाने इन्स्टाग्रामवर तिचे आणि समीरसोबतचे बेबी बंपचे फोटो शेअर करत ते दोघं लवकरच आई बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. या गोड जोडप्याच्या आयुष्यात एका सुंदर आणि गोंडस परीने प्रवेश घेत त्यांचे आयुष्य आनंदाने व्यापून टाकले आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमुळे समीर घराघरात पोहोचला. फिटनेससाठी नेहमी घाम गाळणाऱ्या एका मुलाची अभिमन्यूची भूमिका समीर साकारत आहे. एका लठ्ठ मुलीची आणि ‘फिटनेस फ्रिक’ तरुण नायकाची प्रेमकथा या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे.

२७ नोव्हेंबर २०१६ मध्ये समीर विवाह बंधनात अडकला. त्याच्या पत्नीचे नाव अनुजा परांजपे आहे. अनुजा एक सॉफ्टवेअर इंजीनियर असून ती पुण्यात नोकरी करते. अनुजा आणि समीर यांचे पुण्यातच घर आहे. पण समीर कामानिमित समीर मुंबई मध्ये राहतो.

‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या भूमिकेपासून समीरच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने ‘गोठ’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘अग्निहोत्र २’ या मालिकेत भूमिका साकारल्या. ‘भातुकली’ या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ ८३’मधून नुकताच दिसलेला समीर आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नायकाच्या भूमिकेत दिसत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.