Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

कोरोना व्हायरसच्या भयावह वातावरणात शुक्रवारी (१४ मे) देशभरात ईद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. सामान्य व्यक्तींप्रमाणेच बॉलिवूड कलाकारही सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच चाहत्यांना घरात राहूनच ईद साजरी करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.

यादरम्यान ‘संजू बाबा’ म्हणजेच बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्तने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर ईद साजरी करतानाची झलक शेअर केली आहे. या फोटोंमध्ये संजय दत्त आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे.

पहिल्या फोटोत संजय दत्त आपल्या मुलासोबत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो आपल्या दोन मुलांसह पत्नी मान्यतासोबत दिसत आहे.

या फोटोत अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला असून पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत मान्यताने कॅप्शन दिले की, “ईद मुबारक!”

संजय दत्त सध्या आपल्या कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे आणि तिथूनच त्याने ईद साजरी करतानाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “ईद नेहमीच प्रेम, करुणा आणि कृतज्ञता यांसाठी राहिली आहे. कृपया आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांबद्दल दया दाखवा कारण पूर्वीपेक्षा आता याची सर्वाधिक गरज आहे. मी सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तो बहुप्रतिक्षित ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो मुख्य खलनायक अधीराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्याव्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार यश महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनही मोठ्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट या वर्षी जुलै महिन्यात रिलीझ करण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा… अतिसुंदर! दानिश मोहम्मदने ‘इंडियन आयडल १२’ शोच्या सेटवरच साजरी केली ईद, कोरोना निघून जाण्यासाठीही केली प्रार्थना

हे देखील वाचा