Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड बापाची माया! मुलगी त्रिशालाच्या वाढदिवशी संजय दत्तने केला गोंडस फोटो शेअर; सोबतच लिहिली भावुक पोस्ट

बापाची माया! मुलगी त्रिशालाच्या वाढदिवशी संजय दत्तने केला गोंडस फोटो शेअर; सोबतच लिहिली भावुक पोस्ट

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवशी त्यांचे फोटो शेअर करत शुभेच्छा देत असतात. यापैकीच एक म्हणजे ‘संजू बाबा’ अर्थातच संजय दत्त होय. त्याची मुलगी त्रिशाला दत्त मागील काही दिवसात आपल्या स्टायलिश आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत होती. तिने मंगळवारी (१० ऑगस्ट) आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी संजयने आपल्या मुलीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. तसेच तिला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छाही दिल्या आहेत.

संजय दत्तने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्रिशालाचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्याचसोबत एक भावुक नोटही लिहिली आहे. या फोटोत अभिनेत्याने त्रिशालाला उचलून घेतल्याचे दिसत आहे. तसेच तो तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत आहे. त्रिशालाने या फोटोत लाल रंगाची फ्रॉक परिधान केल्याचे दिसत आहे. (Actor Sanjay Dutt Share Trishala Dutt Childhood Picture On Her Birthday)

फोटो शेअर करत संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्याने मला तुझ्या रूपात एक सुंदर भेट दिली, जेव्हा मी वडील बनलो. जरी तू माझ्यापासून आता दूर राहतेस. मात्र, आपल्याला माहिती आहे की, आपले नाते आणखी मजबूत होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी चिमुकली.” या फोटोत संजय दत्तने त्रिशालाला टॅग करत एक लव्ह इमोजीही शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CSaySBTre_B/?utm_source=ig_web_copy_link

खरं तर संजय दत्त आपली मुलगी त्रिशालाच्या खूपच जवळ आहे. तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो. त्रिशालाही आपल्या वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्रिशाला दत्त ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. ऋचा आणि संजय दत्तचे लग्न १९८७ मध्ये झाले होते. त्यानंतर एकाच वर्षात त्रिशालाचे लग्न झाले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिचे निधन झाले होते. त्यानंतर त्रिशाला आपल्या आजी- आजोबांसोबत परदेशात राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा