Thursday, June 13, 2024

संजय मिश्रा यांना आयुष्यात बसला होता मोठा धक्का, लाज बाजूला ठेवत करायचे ‘हे’ काम

बॉलिवूडचे अभिनेते संजय मिश्रा यांनी आता पर्यंत प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. त्यांच्या अभिनयातील विनोदाने त्यांनी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द साल 1995 मध्ये ‘ओह डार्लिंग ये हे इंडिया’ या चित्रपटापासून झाली. त्यानंतर ‘आखो देखी’ या चित्रपटामधून त्यांना विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. संजय यांनी ‘गोलमाल अगेन’, ‘जॉली एल एल बी 2’, ‘किक 2’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘वेलकम’, ‘धमाल’ या व अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. काही काळानंतर त्यांनी अभिनयामध्ये मोठा ब्रेक घेतला होता. त्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि वाईट प्रसंग घडला ज्याने त्यांना पूर्ण हादरून टाकले होते.

सोडले होते बॉलिवूड
चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने त्या पात्राला जिवंत करणारे आणि नैसर्गिक अभिनय करणारे संजय मिश्रा यांच्या आयुष्यामध्ये मोठा प्रसंग ओढवला होता. यशाचे शिखर गाठत असतानाच त्यांनी मध्येच ते सोडून दिले. कारण त्यांचे वडील शंभूनाथ मिश्रा यांचे निधन झाले होते. संजय यांना या गोष्टीचा खूप त्रास झाला. या दुखा: मधून स्वतःला सावरणे त्यांना कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीमधून काढता पाय घेतला. (Actor Sanjay Mishra started doing dishes in Uttarakhand one phone call changed him life)

उत्तराखंडमध्ये घासली भांडी
वडिलांच्या निधनानंतर स्वतःला सावरता येत नसल्याने, त्यांचे अभिनयाकडे लक्ष लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी उत्तराखंडची वाट पकडली. तिथे गेल्यानंतर ते ऋषिकेशमध्ये राहू लागले. तेथीलच एका खानावळीत त्यांनी चहा बनवण्याचे आणि भांडी घडण्याचे काम केले. कारण अभिनयात लक्ष लागत नसले तरी पोटाची खळगी तर भरावी लागणार. म्हणून त्यांनी हे काम करायला सुरुवात केली.

एका फोनमुळे बदलले आयुष्य
त्यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टीला ही गोष्ट समजली. त्याने तातडीने संजय यांना फोन केला. त्यांनी त्यांची समजूत काढली आणि मुंबईला परतण्याची विनंती केली. संजय देखील त्यांचा शब्द झुगारू शकले नाही. त्यांनी होकार दिला आणि मुंबईला आले. त्यानंतर संजय यांनी एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.

अभिनयाशी नव्हता कुठलाही संबंध
संजय मिश्रा यांचे वडील शंभूनाथ मिश्रा पत्रकार होते आणि आजोबा आयएएस अधिकारी होते. त्यामुळे घरामध्ये कायमच शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण होते. परंतु मनामध्ये अभिनयाची खुमखुमी असणाऱ्या संजय यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले.

हेही नक्की वाचा-
हँडसम आणि डॅशिंग अभिनेते असणाऱ्या विनोद खन्ना यांनी अचानक घेतला होता चित्रपटांमधून संन्यास
शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते 28 टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

हे देखील वाचा