असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. मात्र, त्या बांधलेल्या गाठी समजून आपल्या जोडीदाराला ओळखणे आणि लग्न करणे तसे अवघड आहे. मात्र, काही लोक अतिशय नाजूक पद्धतीने काही गोष्टी अगदी सहज सोडवतात. असंच काहीसे अभिनेते संजीव सेठ आणि अभिनेत्री लता सभरवाल यांच्या बाबतीत घडले आहे.
आज टीव्ही क्षेत्रात सुंदर आणि यशस्वी जोडी म्हणून संजीव सेठ आणि लता सभरवाल यांच्याकडे पहिले जाते. पण ही सुंदर जोडी होणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी संजीव सेठ यांना विशेष प्रयत्न करावे लागले.
संजीव सेठ आणि लता सभरवाल हे स्टार प्लसच्या एका मालिकेत नायिकेच्या आई – वडिलांची भूमिका निभावत होते. जसं जशी मालिका लोकप्रिय होत गेली, तसं तशी या दोघांची जवळीक वाढत गेली. दोघांनाही आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाणीव झाली. तरीही संजीव यांनी लता सभरवाल यांना लग्नासाठी विचारले नाही. याचे कारण होते, संजीव यांचे आधीच झालेले लग्न.
हो संजीव यांनी मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस सोबत लग्न केले होते, आणि त्यांना दोन मुले देखील होते. रेशम आणि संजीव यांच्यात १२ वर्षांचे अंतर होते. मात्र लग्नाच्या ११ वर्षांनी या दोघांनी आपसी सहमतीने घटस्फोट घेतला.
संजीव यांनी आपण पुन्हा प्रेमात पडल्याचे आधी त्याची पहिली पत्नी रेशम आणि त्यांच्या मुलांना सांगितले. या तिघांनीही त्याच्या लग्नचे ऐकून आनंदात उत्साहाने होकार दिला. पहिल्या पत्नी आणि मूळची परवानगी घेऊनच संजीव यांनी लता यांना लग्नचे विचारले. त्यानंतर २०१० साली संजीव यांनी लता सभरवाल यांच्यासोबत लग्न केले.
रील लाईफ असणारी त्याची ही जोडी रियल लाईफमधेही झाली. आता संजीव आणि लता यांना आरव नावाचा एक मुलगा देखील आहे.