मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सध्या ट्रेंडिंगमध्ये असून, यातील झी मराठीवरील एक मालिका जोरदार चर्चेत आहे. ती मालिका म्हणजे ‘तुझी माझी रेशीमगाठ’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कलाकार देखील चांगलेच लोकप्रिय आणि चर्चेत आहेत. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी यांसारखे नावाजलेले कलाकार मालिकेत दिसत असल्याने मालिकेला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. यासोबत या मालिकेत असणारी चिमुकली अभिनेत्री मायरा वैकुळ या मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
मायराचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत असून, मालिकेतील तिची आणि प्रार्थनाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावत आहे. यातील अजून एक लक्षवेधी आणि महत्वाची भूमिका साकारणारे पात्र म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचे. या मालिकेत समीर भूमिका निभावणाऱ्या संकर्षणने थोड्याच काळात त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनात स्थान निर्माण केले आहे. त्याचे सहाय्यक आणि मजेशीर पात्र सगळ्यांनाच खूप आवडत आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, संकर्षण कऱ्हाडे या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. (actor sankarshan karhade take a break from majhi tujhi reshimgath serial)
येत्या काही दिवसातच सर्वत्र नाट्यगृह आणि चित्रपटगृह चालू होणार आहेत. त्यात संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसे’ या नाटकाचे प्रयोग सुरु होणार आहेत. त्यामुळे तो या मालिकेतून ब्रेक घेत असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या या नाटकाचे प्रयोग आता आपल्याला नाट्यगृहात जाऊन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तो जरी मालिकेतून ब्रेक घेत असला तरी देखील तो प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडून देणार नाही.
परंतु या निर्णयाने मालिका प्रेमींमध्ये काहीशा प्रमाणात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण त्यांना आता त्याच्या लाडक्या समीरला दररोज पाहता येणार नाही. खरा मित्र असणारा आणि संकटात आपल्या मित्राची साथ न सोडणाऱ्या समीरला प्रेक्षक नक्कीच मिस करणार आहेत. मालिकेतील त्याची आणि यशची मैत्री सर्वांना खूप आवडते. अगदी कमी कालावधीत मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान निर्माण केले आहे. आता सगळेजण संकर्षण त्याचे नाटकाचे प्रयोग संपवून परत मालिकेत कधी परतणार याची वाट बघत आहेत.
दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी