Saturday, April 20, 2024

‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. ती अनेकवेळा तिच्या पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती चित्रपटापासून जरा दूर आहे, परंतु तरी देखील तिने तिच्या चाहत्यांना अंतर दिले नाही. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिच्या पतीसोबत तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसीने सोशल मीडियावर तिच्या पतीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही ‘तुझी माझी जोडी जमली’ या गाण्यावर डान्स करत हावभाव करताना दिसत आहेत. यावेळी मानसीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच तिचा पती प्रदीप शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. (Marathi actress Manasi naik share a dance video with her husband)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी, प्रदीपच्या जीवावर घालेन मनी मंगळसूत्राची जोडी.” त्यांच्या या व्हिडिओवर त्यांचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. नेहमीप्रमाणेच अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून’, वीकेंडला मांजरेकरांकडून मीरा अन् गायत्रीची खरडपट्टी

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

-‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची’, कुशल बद्रिकेच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा