Friday, April 19, 2024

आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

बॉलिवूड बॉयकॉट‘ या ट्रेंडचा अनेक सिनेमांना जोरदार फटका बसला. त्यामुळे सिनेमांना बजेटइतकीही कमाई करता आली नाही. मात्र, बॉयकॉटसारख्या ट्रेंडला पुरून उरला तो सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पठाण’ सिनेमा. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या सुपरस्टारचा समावेश असलेल्या ‘पठाण’ सिनेमाने कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले. हा सिनेमा बॉलिवूडचा सर्वात यशस्वी सिनेमा बनला आहे. चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखची क्रेझ आजही तितकीच जास्त आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले आहे.

ऍक्शन सिनेमा असूनही ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला भरभरून प्रेम मिळाले. चला तर जाणून घेऊया पठाणने रिलीजच्या 21व्या दिवशी किती रुपयांची कमाई केली आहे…

‘पठाण’ची 21व्या दिवशीची कमाई
शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनित ‘पठाण’ सिनेमाने इतिहास रचला आहे. प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचण्याचं काम ‘पठाण’ करत आहे. कमाईविषयी बोलायचं झालं, तर ‘पठाण’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेव्हापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवलाय आणि बक्कळ कमाई करत आहे. अशात ‘पठाण’च्या 21व्या दिवसाच्या कमाईची आकडेवारीही समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, या सिनेमाने 21व्या दिवशी 5.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘पठाण’ची एकूण कमाई जवळपास 498.90 कोटी रुपये झाली आहे.

‘पठाण’ 500 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
खरं तर, सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ने ‘दंगल’, ‘केजीएफ चॅप्टर-2’, ‘द काश्मीर फाईल्स’ आणि इतर अनेक सिनेमाच्या लाईफटाईम कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर धमाल करत असलेला ‘पठाण’ 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून आता काही पावलेच दूर आहे. ‘पठाण’च्या कमाईचा वेग पाहता, हा विक्रम करण्यास जास्त काळ लागणार नसल्याचे दिसते. तसेच, जगभरातील बॉक्स ऑफिसवरही ‘पठाण’ लवकरच 1000 कोटींचा टप्पा पार करू शकतो. (actor shah rukh khan deepika padukone john abraham film pathaan box office collection day 21 know here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा
‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार

हे देखील वाचा