Thursday, November 30, 2023

शाहरुख अन् दीपिकाचा नवा धमाका, सिद्धार्थ आनंदने उघड केले ‘पठाण’च्या दुसऱ्या गाण्याचे रहस्य

यशराज फिल्म्सच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण‘ या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या पहिल्या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या सर्व गोष्टींमुळे या गाण्याला यूट्यूबवर 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि आता या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘झूम जो पठाण’ रिलीजसाठी सज्ज झाले आहे. या गाण्याचा फर्स्ट लूक यशराज फिल्म्सने चित्रपटातील प्रमुख कलाकार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चाहत्यांसाठी रिलीज केला आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे हे दुसरे गाणे गुरुवारी (दि. 22 डिसेंबर)ला रिलीज होत आहे.

या दुसऱ्या गाण्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, “‘झूम जो पठाण’ हे गाणे चित्रपटाच्या शीर्षकाच्या भावनेशी संबंधित आहे. या चित्रपटात ही व्यक्तिरेखा शाहरुख खानने साकारली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तर या गाण्याच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदाच या महान गुप्तहेर पठाणच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये उलगडणार आहोत. या पात्रात एक संक्रमिक व्यक्तिमत्व आहे जे लोकांना त्वरित त्याच्याकडे आकर्षित करते. या पात्राची ऊर्जा, त्याचा उत्साह, त्याचा आत्मविश्वास प्रेक्षकांना त्यांच्या तालावर नाचायला भाग पाडतो.”

हे गाणे फक्त शाहरुख खानवर असेल की, दीपिका पदुकोणही त्यात दिसणार? या प्रश्नाच्या उत्तरात सिद्धार्थ म्हणतो, “या गाण्यात चित्रपटाचे दोन्ही प्रमुख कलाकार दिसणार आहेत. ही एक मॉर्डर्न फ्यूजन कव्वाली आहे. शाहरुख खानला पडद्यावर एका पॉवर पॅक्ड ट्रॅकच्या सुरात वावरताना बघून खूप दिवस झाले आहेत आणि म्हणूनच हे गाणे शाहरुख खानच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.” असे मत सिद्धार्थ आनंद यांनी मांडले आहे.

‘वॉर’ या त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या अतुलनीय यशाने आनंदित झालेला, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्याचा पुढचा चित्रपट ‘पठाण’ जवळपास पूर्ण करत आहे. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाशिवाय त्याने ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबतचा त्याचा पुढचा चित्रपट ‘फायटर’ वरही काम सुरू केले आहे. दीपिका पदुकोणचा उल्लेख करताना सिद्धार्थ म्हणतो, “पठाण चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ या दुसऱ्या गाण्यात दीपिका पदुकोण पुन्हा एकदा शानदार दिसत आहे. शाहरुख आणि दीपिकाची जोडी ही आतापर्यंतची सर्वात हिट जोडी आहे आणि या दोघांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील चाहत्यांसाठी आमच्याकडून ही एक नवीन भेट आहे.”

या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. 25 जानेवारी 2023 ला हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी चित्रपटगृहांचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे.(second song of movie pathaan to release on december 22 jhume jo pathaan bollywood actor shahrukh khan actress deepika padukone)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारपणामुळे समंथाने उचलले माेठे पाऊल, पडणार का या सिनेमातून बाहेर?

पळा पळा! पतीसोबत असताना नयनताराला चाहत्यांनी घेरले, गर्दीतून धावतानाचा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा