‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १३ वर्षांपासून प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. या शोचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये खास आहे. जेठालाल आणि दयाबेन यांची चर्चा अनोखी आहे. गोकुलधाम सोसायटीमध्ये दररोज गरबा साजरा केला जातो. कारण दया बेन म्हणजेच दिशा वकानीला डान्स करून प्रत्येक आनंद साजरा करण्याची सवय असते. मात्र, तुम्हाला माहित आहे का? की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान दया बेनकडून गरबा शिकला आहे.
ही गोष्ट त्या वेळची आहे, जेव्हा शाहरुख खान त्याच्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात अनेक वर्षांपूर्वी गोकुलधाम सोसायटीमध्ये पोहोचला होता. शाहरुख इथे आल्यावर उत्सवाचे वातावरण होते. शाहरुखच्या स्टाईलची कॉपी करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. मात्र, दया बेनने शाहरुखला त्याचा गरबा शिकवून एक स्टेटसही प्रस्थापित केला होता.
जेठाचा गरबा आहे मस्त
आपण पाहू शकतो की, दया शाहरुखला गरब्याची माहिती सांगत आहे आणि त्याची स्टेप परिपूर्ण करण्यात व्यस्त आहे. मात्र, शाहरुखच्या खांद्याला होणारी वेदना लक्षात ठेवून ती म्हणते की, तू टप्पूच्या वडिलांची स्टेप करुन बघ. मग जेठालाल सरळ उभा राहतो आणि फक्त मान हलवतो. शाहरुख त्याची कॉपी करतो, पण त्याला त्याला त्यावेळी हसू आवरत नाही.
चाहते पाहत आहेत दयाची वाट
दया बेन म्हणजेच दिशा वकानी २०१७ पासून शोमधून गायब आहे. आतापर्यंत तिच्या जागी दुसरी अभिनेत्री आली नाही आणि चाहते अजूनही दिशाची वाट पाहत आहेत. आजही दिशा वकानीच्या एपिसोड्सची दृश्ये ट्रेंड होऊ लागतात.
शाहरुख खानने १९९२ साली आलेल्या ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखची जी भूमिका होती, ती आधी अरमान कोहलीला ऑफर करण्यात आली होती. अरमानने या सिनेमासाठी होकार देखील दिला होता. इतकंच नाही, तर त्याचा फोटो असणारे चित्रपटाचे पोस्टर देखील छापण्यात आले होते. मात्र, काही कारणामुळे त्याने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि या चित्रपटाची शाहरुखला ऑफर मिळाली. या चित्रपटाने बॉलिवूडला एक मोठा सुपरस्टार दिला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Video: कितीही व्यस्त स्केड्युल असले, तरीही आईसोबत वेळ घालवणे विसरत नव्हता ‘खिलाडी’ अक्षय कुमार
-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे