बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जात असतात. सुट्टीला कोठे फिरायला जायचं म्हटले की, अनेक कलाकारांसाठी सध्या मालदीव हे उत्तम ठिकाण बनले आहे. अनेक कलाकार या ठिकाणी फिरायला जाणे पसंत करतात. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. मीराने या ट्रिपचे अनेक फोटो मालदीवमधून शेअर केले आहेत. तिने एका फोटोत स्वतःचे ‘बीच बॉम्ब’ असे वर्णन केले आहे. हा फोटो समुद्रकिनाऱ्यावरचा आहे आणि यामध्ये मीरा पांढऱ्या रंगाची बिकिनी आणि हिरव्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मीराचे चाहते या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि हृदयाचे इमोजी देखील लावत आहेत. त्याचवेळी तिच्या एका चाहत्याने या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “मीरा आज जगाला दाखव…”
उल्लेखनीय म्हणजे मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या फॉलोअर्सचीही संख्या देखील खूप जास्त आहे. तिचे नवीन बोल्ड बिकिनी फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. ती बिकिनीमध्ये अतिशय ग्लॅमरस आणि मादक दिसत आहे. याआधीही तिने तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण या नवीन फोटोत ती खूपच आकर्षक दिसत आहे. मीरा अभिनेत्री नसली तरी तिची लोकप्रियता आणि प्रसिद्ध कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
सर्वांना माहीत आहे की, मीरा आणि शाहिद बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडपे आहे. यापूर्वी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती बीचवर योगा करत आहे. त्याचा हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर सूर्यनमस्कार करताना दिसली होती. मीराने शाहिदसोबत एक जबरदस्त सेल्फीही शेअर केला आहे. त्यासह कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “मी ट्रेनरला घरी घेऊन जाऊ शकते का?” मीराच्या बिकिनी फोटोला १ लाख ३६ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे आणि त्यावर हजारो कमेंट्स देखील येत आहेत.
दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी