Saturday, June 29, 2024

आपली यारी! एक मुलगा आणि मुलगी असू शकतात चांगले मित्र, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी दिले दाखवून

‘प्रेम मैत्री आहे, मैत्रीशिवाय प्रेम होऊच शकत नाही, एक मुलगा आणि मुलगी कधीच मित्र होऊ शकत नाही, कारण त्यांच्यात प्रेम हे येतेच,’ बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये आपण असे अनेक डायलॉग ऐकले असतील. पण तुम्हाला माहित आहे का? की अनेक बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी खऱ्या आयुष्यात हे खोडून काढले आहे. दाखवून दिले आहे की, एक मुलगा आणि मुलगी कायमस्वरूपी चांगले मित्र बनून राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे कलाकार कोण आहेत.

‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे खूप चांगले मित्र
असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत, ज्यांच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचे बाँडिंग खूप चांगले आहे. हे कलाकार अनेकदा सुख-दु:खाच्या प्रसंगी एकत्र दिसतात आणि त्यांच्या मैत्रीचे खूप कौतुक केले जाते. चला तर मग बॉलिवूडच्या या मित्रांबाबत जाणून घेऊ.

प्रीती झिंटा- सलमान खान
बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटाची इंडस्ट्रीतील सर्वांशी चांगली मैत्री आहे. अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांसोबतची तिची मैत्री खूप चांगली मानली जाते. प्रीती आणि सलमान खूप चांगले मित्र आहेत. केवळ सलमानच नाही, तर प्रीतीची संपूर्ण खान कुटुंबाशी चांगली मैत्री आहे. सोहेल खान प्रीतीला फक्त झिंटा म्हणतो. अनेक प्रसंगी प्रीती आणि सलमान आपली मैत्री व्यक्त करताना दिसले आहेत.

शाहरुख खान- काजोल
शाहरुख खान आणि काजोलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे. जेव्हा-जेव्हा दोघे पडद्यावर एकत्र आले, तेव्हा त्यांच्या केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावली. खऱ्या आयुष्यात दोघे खूप चांगले मित्र असले, तरीही काजोल म्हणते की, ती एकमेव अभिनेत्री आहे, जी शाहरुखचे गाल ओढू शकते आणि चाहत्यांना त्यांचे गोंडस बाँडिंग आवडते.

वरुण धवन- आलिया भट्ट
वरुण धवन आणि आलिया भट्ट हे स्टार किड्स आहेत. दोघांनी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पडद्यावरची त्यांची जोडी चाहत्यांना आवडत असली, तरी खऱ्या आयुष्यात मात्र दोघांच्या गोड बोलण्यातूनच त्यांची मैत्री किती घट्ट आहे हे समजते.

करण जोहर- ट्विंकल खन्ना
करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते. करण जोहरची खिल्ली उडवण्यापासून ट्विंकल कधीही मागे हटत नाही. त्याचवेळी करणलाही ट्विंकलसोबत खूप कम्फर्टेबल वाटते. दोघांची फनी केमिस्ट्री चाहत्यांना आवडते.

शाहरुख खान- जुही चावला
जुही चावलासोबतची शाहरुख खाची जोडी पडद्यावरही चांगलीच पसंत पडली आहे. त्याचबरोबर दोघेही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. शाहरुख आणि जुही आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचे मालक आहेत, तर आर्यनच्या जामीनावेळी जुही चावलाही हजर झाली होती.

यावरून त्यांच्यात किती चांगली मैत्री आहे, हे दिसून येते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा