शाहरुख खानने मुलगी सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी ठेवल्या आहेत ‘या’ सात अटी


अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) फिल्मी दुनियेचा बादशाह म्हटले जाते. त्याने या इंडस्ट्रीला खूप हिट चित्रपट दिले आहेत. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. पण शाहरुख फॅमिली मॅन आहे हेही सर्वश्रुत आहे. त्याचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि जेव्हाही त्याच्या कुटुंबावर कोणतेही संकट येते तेव्हा तो ढालीप्रमाणे समोर उभा असतो. पण जेव्हा तो त्याची मुलगी सुहाना खानचा विचार करतो, तेव्हा शाहरुख त्याच्या लाडक्या लेकीच्या सुरक्षेचा जास्त विचार करतो. शाहरुख आपल्या मुलीला राजकुमारीप्रमाणे वागवतो आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.

इतकेच नाही, तर शाहरुख सुहानाचा बॉयफ्रेंड आणि तिच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टीही ठरवतो. एकदा शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सुहानाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत, याबद्दल सांगितले होते.

शाहरुखने आपल्या एका मुलाखतीत मुलगी सुहानाच्या बॉयफ्रेंडशी संबंधित ७ गुण सांगितले होते, जे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तो म्हणाला होता की, “माझ्या मुलीला डेट करण्यासाठी सात सामान्य अटींचे पालन करावे लागेल. नोकरी कर, आपण असे समजू की, मला तो आवडत नाहीस, मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असेल, माझा वकील देखील सोबत ठेवेल, सुहाना माझी राजकुमारी आहे आणि तो तिला जिंकू शकत नाहीस. मला पुन्हा तुरुंगात जाण्यास काहीच हरकत नसेल आणि तो जे काही तिच्यासोबत करशील, ते मी त्याच्यासोबत करेल.”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये शाहरुखने त्याची मुलगी सुहानाच्या भावी बॉयफ्रेंडबद्दल वक्तव्य केले होते. या शोच्या पाचव्या सीझनमध्ये शाहरुख आलियासोबत पोहोचला होता. यादरम्यान आलियाने सांगितले की, “तिला वयाच्या १६ व्या वर्षी पहिला बॉयफ्रेंड होता.” हे ऐकून करणने शाहरुखला विचारले, “तुझी मुलगी १६ वर्षांची आहे, जर तिच्या बॉयफ्रेंडने तुझ्या मुलीला किस केले तर? तू त्या व्यक्तीला मारून टाकणार का?”

यावर शाहरुख म्हणतो, “मी त्याचे ओठ कापून टाकेल.” शाहरुखचे हे उत्तर ऐकून करण म्हणाला की, “मला हे माहित होते.” यावर शाहरुख म्हणाला, “१०० टक्के. एवढेच नाही, जर आर्यनने एखाद्या मुलीला किस केल्याचे मला समजले तर मी आर्यनचेही ओठ कापेल” असेही म्हटले होते.

शाहरुख खानने गौरी खानसोबत १९९१ मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या सहा वर्षानंतर गौरीने मुलगा आर्यन खानला जन्म दिला. त्यानंतर २००० साली शाहरुख-गौरीच्या घरी मुलगी सुहाना खानचा जन्म झाला आणि २०१३ मध्ये सरोगसीद्वारे हे जोडपे अबराम खानचे पालक झाले.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!