Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड न्यायालयाने फेटाळला आर्यनचा जामीन; शाहरुखचा मुलगा राहणार तुरुंगातच

न्यायालयाने फेटाळला आर्यनचा जामीन; शाहरुखचा मुलगा राहणार तुरुंगातच

कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने जामीन अर्जाचा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आजच्या बुधवारी (२० ऑक्टोबर) सुनावणी वेळी कोर्टाने आर्यन खानचा जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.

 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा (शनिवारी) २ ऑक्टोबर रोजी अं’मली पदार्थांच्या प्रकरणात सापडल्याने तुरुंगात आहे. या प्रकरणी अनेकवेळा कोर्टात सुनावणी झाली आहे. याआधी देखील त्याचा जामीन फेटाळला गेला आहे. याआधी बुधवारी (१३ ऑक्टोबर) रोजी कोर्टात सुनावणी होती. तेव्हा कोर्टाने त्याला बुधवारी (२० ऑक्टोबर) ही पुढील तारीख दिली होती. आजच्या दिवशी दुपारी कोर्टात सुनावणी चालू असताना त्याचा जामीन पुन्हा एकदा नाकारला आहे.

Photo Courtesy: Instagram/___aryan___

न्यायालयाच्या १३ ऑक्टोबरच्या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत आर्यन खानचा खटला सेलिब्रिटी वकील सतीश मानेशिंदे हाताळत होते. परंतु याप्रकरणी जामीन मिळवून देण्यात त्यांच्या हाती अपयश आल्यानंतर शाहरुख खानने हा खटला वकील अमित देसाई यांच्या हाती सोपवला. ११ ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यान वकील सतीश मानेशिंदे यांच्याबरोबर अमीत देसाई देखील आर्यनच्या जामीनाखातर न्यायालयात हजर होते. परंतु आता अमित देसाई देखील आर्यनला जामीन मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता किती दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे, याची कोणालाही कल्पना नाहीये.

बातमी अपडेट होत आहे…

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा