अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी


 

बॉलीवूडमध्ये शानदार अभिनयासाठी, सुंदरतेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता राव. आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे, निरागस आणि सोज्ज्वळ लूकमुळे अमृता नेहमीच चर्चेचा विषय असते. ती सध्या चित्रपटांपासून लांब तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. याकाळात ती सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे.

अमृताने १५ मे २०१६ रोजी आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृताचे लग्न तिच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्काच होता. कारण कोणालाही अमृताच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि प्रेम प्रकरणाविषयी माहिती नव्हती. जेव्हा अमृताचे लग्न झाले तेव्हा तिच्या नवऱ्याबद्दल खूप चर्चा झाल्या. जेव्हा आरजे अनमोल तिचा नवरा असल्याचे समजले तेव्हा त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सगळ्यांनाच खूप आकर्षण वाटले. जवळपास ११ वर्षानंतर पहिल्यांदाच, अमृता आणि अनमोल त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांना सांगणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कपल ऑफ थिंग्ज’ या शीर्षकाखाली ते त्यांची प्रेमकथा त्यांच्या चाहत्यांना अतिशय अनोख्या पद्धतीने सांगणार आहेत.

हे कपल खासकरून त्यांच्या लव्हलाइफबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच सार्वजनिक ठिकाणी, मीडियासमोर बोलणे टाळतात. त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच सर्वांपासून दूर ठेवले. आजपर्यंत कधीही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ते त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसले नाहीत. अमृता आणि अनमोल हे एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असणार आहे. या संधीचा फायदा घेत ते दोघं त्यांची मस्त आणि सुंदर लव्हस्टोरी सर्वांना सांगणार आहे. ज्यात त्यांच्या रोमान्सशी संबंधित अनेक वैयक्तिक गोष्टी देखील असणार आहे. अमृता म्हणते, “चित्रपट कलाकार आणि रेडिओ जॉकी यांच्यातील प्रेमकथा यापूर्वी कधीही घडली नसेल. आमची प्रेमकथा खरोखरच अनोखी आहे. आमचे नाते आमच्यासाठी नेहमीच खूप पवित्र राहिले आहे, ”

अमृता रावने २००२ मध्ये ‘अब के बारस’ द्वारे पडद्यावर पदार्पण केले होते, परंतु तिला ‘विवाह’ चित्रपटानंतर अमाप लोकप्रियता मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दादा, तू माझे जग आहे’, म्हणत बॉबी देओलने बहिणींसोबतचा फोटो पोस्ट करत सनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो

-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.