Friday, July 5, 2024

नेहमी थाटामाटात होणारा आर्यनचा वाढदिवस यावर्षी शांततेत होणार साजरा, बहीण सुहाना अन् कुटुंबातील सदस्य…

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने २ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. यानंतर आता त्याचा लाडका लेक आर्यन खान शुक्रवारी (१२ नोव्हंबर) आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी शाहरुखने आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वात वेगळा मार्ग निवडला आहे. यावर्षी शाहरुख आर्यनचा वाढदिवस ‘मन्नत’वरच साजरा करणार आहे. अभिनेत्याच्या मुलाने नुकतेच आयुष्यातील सर्वात वाईट काळ पाहिला आहे. मात्र, आता यातून तो हळूहळू बाहेर पडताना दिसत आहे.

शाहरुख खान दरवर्षी त्याचा मुलगा आर्यन खानचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा. प्रत्येक वाढदिवसाला वेगळाच थाट असायचा. ग्रँड सेलिब्रेशनही असायचे, पण यंदा असे काही पाहायला मिळणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्यन खानचा २४ वा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या सेलिब्रेशनमध्ये आर्यन खानच्या कुटुंबातील सदस्य आणि त्याची बहीण सुहाना अमेरिकेतून फेसटाइमद्वारे सामील होणार आहेत. (Actor Shahrukh Khan Son Aryn Khan Celebrate His 24th Birthday)

दरवर्षी आर्यन खानचा वाढदिवस त्याच्या कुटुंबाने खास बनवला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुख खान दरवर्षी त्याच्या वाढदिवशी आर्यन खानला आंतरराष्ट्रीय सुट्टीवर पाठवत असे, आवडते गॅजेट्स द्यायचा आणि विद्यापीठातील मित्रांना सरप्राईज पार्ट्या द्यायचा.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुख यावर्षी आर्यन खानचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा करत नाहीये. अलिबागला गेल्यावर आर्यनला पॅपराजींना सामोरे जावेसे वाटत नाही, असे शाहरुख खानला वाटते.

शाहरुख शेवटचा ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. हा चित्रपट पडद्यावर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. त्याचबरोबर या चित्रपटात त्याची मुलगी सुहानानेदेखील असिस्ट केले होते. या चित्रपटानंतर शाहरुखने बराच ब्रेक घेतला आहे. मात्र, आता तो लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा