सध्या मनोरंजन क्षेत्रातील काही कपल्स कोरोनातही सुखाचे आणि आनंदचे क्षण जगात आहेत. करीना आणि अनुष्का ह्या हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी ह्यावर्षी ‘गुड न्यूज’ दिली. तर मराठीत धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वी तिची गोड बातमी दिली. आता २०२० च्या शेवट शेवट मराठीतील क्युट कपल शशांक आणि प्रियांका यांनी देखील त्यांची ‘गुड न्यूज’ दिली आहे.
नाताळचा मुहूर्त साधत शशांक आणि प्रियंका या जोडीने ते दोघं आता तिघं होत असल्याची बातमी सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्वाना सांगत सुखद धक्का दिला.
यावेळी शशांकने त्याचा आणि प्रियंकाचा बेबी बंप दिसत असलेला एक गोड फोटो शेयर करत एक छान मेसेजही लिहिला आहे. “आम्हाला नेहमीच माहिती होतं की सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो. मात्र आम्हाला हे माहित नव्हतं की आम्हालाही एकदिवस एक सुंदर भेटवस्तू मिळेल. आम्हा तिघांकडून या सुट्टीच्या सिझनच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा!”
शशांकनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांसोबतच इतर सेलिब्रिटींनी देखील त्याच्यावर अभिनंदानाचा वर्षाव सुरु केला आहे. शशांकने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो अनेक मालिका आणि चित्रपटात दिसला. शशांकने वकील असलेल्या प्रियांका ढवळे सोबत २०१७ मध्ये पुण्यात लग्न केले.