Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘पॅंट फाटली अन्…’, हॅलोविन पार्टीत शक्तीमान झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

‘पॅंट फाटली अन्…’, हॅलोविन पार्टीत शक्तीमान झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारा सिद्धांत चतुर्वेदी(Siddhant Chaturvedi) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय हुशार अभिनेता आहे. सध्या सिद्धांत त्याच्या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अलीकडेच सिद्धांत चतुर्वेदीने हॅलोवीन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात त्याने शक्तीमानचे रूपात दिसला. मात्र, हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यानं चाहत्यांना पार्टीत त्याच्यासोबत काय झालं या विषयी सांगितले आहे.

गंगाधराचा अवतार का घ्यावा लागला
सिद्धांत चतुर्वेदीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओच्या शेअर केला आहे. या व्हिडिओत सिद्धांत हॅलोविन पार्टीच्या निमित्ताने शक्तीमानच्या भूमिकेत येताना दिसतो, पण काही वेळातचं सगळं गडबड होऊन जातं. मग सिद्धांत म्हणतो, पाहू नका पॅट फाटली आहे. त्यानंतर तो पँटसमोर हात ठेवतो. पुढे म्हणतो तू व्हिडीओ घेत आहे का? शक्तिमानची चड्डी फाटली, त्यामुळे मला गंगाधरच्या रुपात यावे लागलं.

 

View this post on Instagram

 

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धांत हसताना दिसत आहे आणि ‘बघू नकोस’ असे म्हणत आहे. व्हिडिओ शेअर करताना सिद्धांतने कॅप्शनमध्ये ‘शक्तिमान’ची माफी मागितली आणि ‘सॉरी शक्तिमान’ असे लिहिले. नेटकऱ्यांनी त्याच्या या लूकचे खूप कौतुक केलं आहे. हॅलोविन पार्टीमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आपल्या खास स्टाइलमध्ये पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. ‘शक्तिमान’ हे नाटक दूरदर्शनवर प्रसारित झाले होते. त्यावेळचा तो खूप धमाकेदार शो असायचा. चाहत्यांना अजूनही यूट्यूबवर शक्तीमान पाहायला आवडते.

या चित्रपटात दिसणार आहे
४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘फोन भूत’ या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांतसोबत कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर ही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अल्लाहा के बंदे हसते…’ गात ‘या’ गायकाने 35व्या वयातच घेतला अखेरचा श्वास

खुशखबर! शाहरुखचा पठाण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, चाहत्यांनी केला शुभेच्छाचा वर्षाव

हे देखील वाचा