गणपती विसर्जनात भोजपुरी गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

0
65
siddhant chaturvedi
Photo Courtesy: Instagram/siddhantchaturvedi

यावर्षी गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आले आणि या खास प्रसंगी सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले. यादरम्यान, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा (siddhant chaturvedi) सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बाप्पाची शेवटची आरती करताना दिसत आहे. यासोबतच तो शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, हृतिक रोशनसह अनेक सेलिब्रिटींच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिद्धांत ‘लॉलीपॉप लागेलू’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सिद्धांतने कॅप्शन लिहिलं,’गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर। मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च गणपति बप्पा मोर्या।’ व्हिडिओमध्ये सिद्धांत शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना आणि त्यानंतर विसर्जन करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

जोमाने नाचला सिद्धांत
व्हिडिओमध्ये सिद्धांत केवळ बाप्पाची पूजा करताना दिसत नाही, तर जोमाने नाचतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिद्धांत एक-दोन नव्हे तर अनेक गाणी ऐकताना दिसत आहे. सिद्धांतने ‘गली गली में’, ‘ओ हो हो हो’, ‘देवा श्री गणेशा’, ‘वाट लागली’, ‘ढोल बाजे’, ‘लॉलीपॉप लागेलू’ आणि ‘सामे’ या गाण्यांवर डान्स केला. सिद्धांतचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरला आहेत.

सिद्धांत नव्याला डेट करत आहे ?
कॉफी विथ करणच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सिद्धांत चतुर्वेदी, कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर आले होते. करणने सिद्धांतला विचारले की, त्याला कोणी आवडते का? यावर सिद्धांत म्हणाला, ‘मी फक्त कामावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या मी पूर्णपणे सिंगल आहे. सिद्धांतच्या या विधानादरम्यान ईशान खट्टर म्हणाला- अहो! त्यांना आनंदा बद्दल प्रश्न विचारा. करण जरा गोंधळून जातो आणि विचारतो की मी आनंदाबद्दल विचारू का? आनंदा म्हणजे काय? सिद्धांत मग विषय बदलतो आणि म्हणतो, नाही… नाही मी सिंगल आहे ते पण इतका की, ईशान माझ्यासोबत हँग आउट करता – करता तोही सिंगल झाला आहे. अशा परिस्थितीत सिद्धांत आणि बिग बींची नात नव्या नंदा यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

सिद्धांत चतुर्वेदीविषयी बाेलायचे झाले तर, त्याने आपल्या करिअरची सुरुवात ‘इनसाइड एज’ या वेब सीरिजमधून केली, ज्यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने गली बॉयमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. या चित्रपटात तो रॅपरची भूमिका साकारत हाेता. या चित्रपटात त्याने एम.सी. शेरची भूमिका साकारली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’

उतावळ्या चाहत्याचा ऋतिक रोशनसोबत बळजबरीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न, संतापलेल्या अभिनेत्याने चांगलंच झापलं
विकी कौशलने कॅटरिनासोबत केले ‘असे’ काही की; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘नक्की काय करायचं बाबा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here