Sunday, May 19, 2024

सायना नेहवालवर आक्षेपार्ह कमेंट करणं सिद्धार्थला पडलं महागात, हैदराबाद पोलिसांनी केला गुन्हा दाखल

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर (Saina Nehwal) आक्षेपार्ह कमेंट केली होती. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले होते. अभिनेता सिद्धार्थने सायना नेहवालची माफी मागितली होती. पण ताज्या वृत्तानुसार, हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी ही वादग्रस्त कमेंट केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हैदराबाद सायबर क्राइम विंगचे अतिरिक्त डीसीपी केव्हीएम प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले की, प्रेरणा नावाच्या महिलेने अभिनेता सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याविरुद्ध आयपीसी ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील सुरक्षेतील त्रुटींवर ट्वीट केले होते. सायनाने ट्वीट करून चिंता व्यक्त केली होती. सायना नेहवालच्या या ट्वीटवर सिद्धार्थने “*** वर्ल्ड चॅम्पियन… देवाचा आभारी आहे की, आमच्याकडे भारताचे रक्षक आहेत,” अशी आक्षेपार्ह कमेंट केली होती.

या कमेंटमुळे सिद्धार्थच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून, त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यानंतर अभिनेत्याने सायना नेहवालची माफीही मागितली. सिद्धार्थच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया देताना सायना नेहवालने महिलेविरोधात असे शब्द वापरू नयेत, असे म्हटले होते.

सिद्धार्थच्या ट्वीटवर सायनाने दिली होती प्रतिक्रिया
एका मुलाखतीत सायना नेहवालने सिद्धार्थच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. “त्याला काय म्हणायचे आहे ते मला माहित नाही… एक अभिनेता म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले होते पण तो चांगला नव्हता. तो स्वतःला अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करू शकला असता. मला वाटते कदाचित ट्विटरवर तुम्ही लोकांच्या नजरेत राहता. असे शब्द आणि कमेंट जर भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल तर मला खात्री नाही की देशात काय सुरक्षित आहे,” असे म्हणत तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिनेता सिद्धार्थ हा बॉलिवूड चित्रपट ‘रंग दे बसंती’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो बॉलिवूड चित्रपटांसह दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही दिसला आहे. या वादानंतर अभिनेता सिद्धार्थला सोशल मीडियावर युजर्सच्या द्वेषाचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा