Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शेवटची आठवण! निधनापूर्वी आईसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता सिद्धार्थ शुक्ला

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या निधनाच्या बातमीने संपूर्ण अभिनय क्षेत्र हादरून गेले आहे. अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थचे निधन होण्यापूर्वी तो शेवटचा आई रीता शुक्ला यांच्यासोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. तो आणि त्याची आई पॅपराजींच्या कॅमेरात स्पॉट झाले होते.

सिद्धार्थ शुक्लाच्या या निधनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूड हादरून गेले आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांना देखील या बातमीने खूप मोठा धक्का बसलेला आहे. सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला आहे, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही.

सिद्धार्थचे हे फोटो पाहून कोणालाही खरं वाटत नाही की, त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कारण तो या फोटोमध्ये एकदम तंदुरुस्त असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

सिद्धार्थबद्दल थोडक्यात
सिद्धार्थ शुक्लाला व्यवसाय करण्याची खूप इच्छा होती. परंतु आईच्या सांगण्यावरून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. सर्वप्रथम त्याने मॉडेलिंगपासून सुरुवात केली होती. त्याने आपल्या अभिनयची सुरुवात सोनी टीव्हीवरील ‘बाबुल का अंगण छूटे ना’ या मालिकेतून केली. त्यानंतर त्याने ‘जाने पहन से … ये अजनबी’ या मालिकेत काम केले. त्यानंतर २०१२ मध्ये आलेली ‘बालिका वधू’ या मालिकेपासून तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला.

सिद्धार्थ शुक्लाने २०१४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ ‘खतरों के खिलाडी ७’ या शोचाही विजेता राहिला आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस १३’ चा विजेता होता. तेव्हापासून सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी सुपरहिट झाली. यानंतर या दोघांवर एक गाणं ही चित्रीत करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

-सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचा विषय

हे देखील वाचा