Thursday, April 25, 2024

सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचा विषय

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. ही बातमी संपूर्ण इंडस्ट्रीसाठी धक्कायदायक ठरली. ही बातमी ऐकून मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थने १ सप्टेंबर रोजी रात्री औषध घेतल्यानंतर त्याच्या खोलीचे दार बंद केले आणि तो झोपी गेला. मात्र, तो आज (२ सप्टेंबर) सकाळी झोपेतून उठलाच नाही. जेव्हा त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. म्हणजेच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सिद्धार्थच्या मृत्यू दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण सुशांतचे निधन देखील मनोरंजन इंडस्ट्रीसाठी खूपच मोठा धक्का होता. दोन्ही अभिनेत्यांचा मृत्यू खूप कमी वयात झाला. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याचे चाहते प्रचंड दुःखी झाले होते. आजही सुशांतचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. सुशांतच्या आणि सिध्दार्थ यांच्या मृत्यू प्रकरणात काही घटना सारख्याच झाल्याचे दिसून येत आहे.

रात्री औषध घेतल्यानंतर सिद्धार्थला झोप लागली. तर सकाळी त्याच्या मृत्यूच्या बातमी वाऱ्यासारखी पसरली. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. १२ डिसेंबर १९८० रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यांनी २००४ मध्ये पदार्पण केले. २००८ मध्ये ते ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही सिरियलमध्ये दिसले.

सिद्धार्थने जरी २००८ मध्ये टीव्हीवर पदार्पण केले असले तरी त्याला खरी लोकप्रियता ही ‘बालिका वधू’ या मालिकेमधून मिळाली. त्यानंतर त्यांने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही दिसले. सिद्धार्थने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘बिग बॉस १३’ मधून तो प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आला. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्याची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये देखील दिसले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

हे देखील वाचा