एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्यावर आज आलीय ‘हे’ काम करायची वाईट वेळ


चित्रपट सृष्टीमध्ये येऊन आपले नाव कमावणे ही खरंतर जोखमीची व मोठी गोष्ट आहे. हे नाव कमावण्यासाठी अनेकांना किती तरी वर्ष जातात. तर काहींना यासाठी काहीच कष्ट घ्यावे लागत नाही. पण काहींना हीच ओळख संकट ठरते. असेच काहीसे एका टेलिव्हिजन कलाकारासोबत झाले आहे. सुनील नागर हे नाव ऐकलंच असेल. हो अगदी बरोबर ओळखलत!! श्री कृष्ण मालिकेतील भीष्म पितामह यांची भूमिका निभावलेली अभिनेते सुनील नागर.

श्री कृष्ण मालिकेतील त्यांचे हे पात्र निभावण्यासाठी त्यांनी खूप कठीण परिश्रम घेतले. त्यामुळे प्रेक्षकांना ते नेहमी खऱ्या-खुऱ्या भीष्म पितामह प्रमाणे भासत असे. त्यांच्या या पात्रामुळे ते इतर कोणत्याच पात्रात फिट झाले नाही. त्यामुळे इतर कोणत्या मालिकेत त्यांना काम मिळणे अवघड होऊ लागले. त्यांची ही ओळख त्यांना संकट वाटू लागले. सुनील नागर यांच्या बाबतीत ही गोष्ट सोशल मीडियावर आली आहे की, त्यांचे बँक डिटेल्स सर्वत्र व्हायरल होत आहेत.

सुनील यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा देखील केला होता. त्यांनी सांगितले होते की,”मी अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांनी देखील माझी साथ सोडून दिली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मला माझे घर देखील विकावे लागत आहे. परंतु तरीही काही पर्याय नाही निघाला.”

इंडिया डॉट कॉमला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की,”माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आहे की, कोणाला दोष देऊ हे मला कळत नव्हते. जेव्हा मी काम करत होतो, तेव्हा खूप कमाई झाली होती. मी अनेक सुपरहिट शो आणि अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी प्रेक्षकांनी माझ्या कामाला खूप पसंती दर्शवली होती. पण आज माझ्याकडे काहीच काम नाहीये. मी एक प्रशिक्षित गायक आहे. काही दिवसांपूर्वी मला काही गाण्यांची ऑफर मिळाली होती. ते लोक मला दररोजचे मानधन देत होते. पण लॉकडाऊनमुळे ते काम देखील बंद झाले आहे. त्यामुळे आता अशी वेळ आली आहे की, मागील काही महिन्यापासून मी घराचे भाडे देखील दिले नाहीये.”

अश्याप्रकारे सुनील नागर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. एका प्रसिद्ध कलाकारापासून ते आजचा हा प्रवास त्यांनी व्यक्त केला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.