Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच सर्व भारतीयांमध्ये एक नवीन उत्साह, एक नवीन जल्लोष पाहायला मिळतो. या महिन्यामध्येच एक अशी जादू आहे, जी सर्व देशवासियांमध्ये देशाबद्दल प्रेम जागृत करते. सर्वांना ते भारतीय असण्याची आठवण करून देते. त्यामुळे ऑगस्ट महिन्या सुरू झाला की सर्वांचेच लक्ष १५ ऑगस्ट या तारखेकडे असते. या दिवशी आपला देश १५० वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीत राहून स्वतंत्र झाला. पुढच्या काही दिवसातच आपण आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत, त्यामुळे यावर्षीचा स्वातंत्र्यदिन नक्कीच खास असणार आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेता असणाऱ्या टायगर श्रॉफने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या दमदार बॉडीसाठी, धमाकेदार डान्ससाठी, जबरदस्त ऍक्शन्ससाठी आणि त्याच्या लूकसाठी ओळखला जातो. मात्र आता लवकरच टायगरच्या या यादीत त्याचा अजून गुण सामील होणार आहे. नुकतेच टायगरच्या ‘वंदे मातरम’ या गाण्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याने त्याच्या आवाजात हे ‘वंदे मातरम’ गीत गायले आहे. याआधी टायगरने ‘अनबिलीव्हेबल’ आणि ‘कसिनोव्हा’ ही दोन इंग्लिश गाणी गायली आहेत. मात्र, हे त्याचे पहिलेच हिंदी गाणे आहे. (tiger shroff shared a teaser for an upcoming music video)

या ‘वंदे मातरम’ गाण्याचा दमदार आणि आकर्षक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिरंग्याच्या तिन्ही रंगात न्हाऊन निघालेले हे गाणे पाहताना, ऐकताना अतिशय शांत वाटत असून, टायगरचा दमदार डान्स गाण्याला अधिक लक्षवेधी बनवत आहे. टाइगर श्रॉफने गायलेले वंदे मातरम् रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, विशाल मिश्रा द्वारा रचित, कौशल किशोर द्वारा लिखित, तर अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे. हे गाणे येत्या १० ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

टायगर लवकरच आपल्याला ‘हीरोपंती २’, ‘बागी ४’, ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिकेत दिसून येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा