Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’

भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या डेटिंगच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. काही काळापूर्वी सोनाक्षी लग्न करणार असल्याची चर्चा हाेती. नुकतेच सोनाक्षी आणि झहीर इक्बाल मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर दिसले होते. त्यांच्या डिनर डेटचा फाेटाे साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. 

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्यासोबत ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटात झळकलेला अभिनेता वरुण शर्मा (Varun Sharma) याने सोनाक्षी आणि झहीरच्या डिनर डेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना वरुण शर्माने लिहिले की, “ओये होये, याला ब्लॉकबस्टर कपल म्हणतात.”

Varun-Sharma-Insta-Story
Photo Courtesy Instagramfukravarun

याआधी झहीरने (Zaeer Iqbal) सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे सोनज्ज, मला न मारल्याबद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो, येणाऱ्या काळातही आपण असेच खात, हसत-खेळत दिवस घालवू.”

झहीरच्या या सुंदर व्हिडिओवर सोनाक्षीनेही प्रतिक्रिया देताना “थॅंक यू, लव्ह यू. मी तुला मारायला येत आहे,” असे गमतीशीर कॅप्शन दिले होते. झहीरची ही पोस्ट आणि त्यावर अभिनेत्री सोनाक्षीची प्रतिक्रिया यामुळे त्यांच्या लव्हस्टोरीचा खुलासा झाला होता. काही दिवसांपूर्वी दोघेही एका लग्नात सोबत फिरताना दिसले होते, तर अभिनेत्री सोनाक्षीने सोशल मीडियावर अंगठीचे फोटोही दाखवले होते, यामुळेच त्यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती.

अभिनेता झहीर इक्बालने 2019 मध्ये ‘नोटबुक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात झहीरसोबत प्रनूतन बहल दिसली होती. हा चित्रपट सलमान खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनला होता. झहीरचे वडील इक्बाल रतनसी हे सलमान खानचे मित्र आहेत. त्यामुळे झहीर त्यांच्या वडिलांसोबत सलमान खानच्या सेटवर कायम जात होते. इथून त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘रोअर’मधून तिचे OTT पदार्पण करणार आहे. याशिवाय तिचा ‘काकुडा’ हा हॉरर कॉमेडी चित्रपटही चर्चेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान
लहाणपणी सलवारमध्ये अशी दिसायची सारा, आत्याने शेअर केलेला फोटो पाहून बसणार नाही विश्वास…
चाहत्याने गुलाबाचे फूल देताच आर्यनने केले असे काही, चाहत्यांना दिसली शाहरुखची झलक

हे देखील वाचा