Monday, June 17, 2024

‘देवदास’च्या रंगात रंगली सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षितच्या ‘मार डाला’ गाण्यावर केल्या स्टेप्स

बी-टाऊनमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi sinha) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही बराच वेळ घालवते. सोनाक्षी सिन्हा दररोज तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ‘देवदास’ चित्रपटातील मार डाला गाण्यावर माधुरी दीक्षितप्रमाणे नाचताना दिसत आहे.

वास्तविक सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनाक्षी सिन्हाने ‘देवदास’मधील माधुरी दीक्षितच्या (Madhuri dixit) मार डाला गाण्याचा लूक स्वीकारला आहे. सोनाक्षी सिन्हा हिरव्या रंगाच्या लेहेंगा चुनरीच्या पारंपारिक शैलीत कहर करताना दिसत आहे. इतकेच नाही तर सोनाक्षीने या व्हिडिओमध्ये देवदास चित्रपटातील मार डाला गाणेही टाकले आहे, ज्यावर सोना नाचताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या या व्हिडिओची स्तुती करावी तितकी कमी आहे, कारण तिचा लूक आणि माधुरी स्टाईलमधील डान्स दोन्ही प्रेक्षणीय आहे. त्यामुळेच सोनाक्षी सिन्हाचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोनाक्षीच्या या व्हिडिओला चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

दुसरीकडे, सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षी सिन्हा बर्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण आगामी काळात सोनाक्षी सिन्हा बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत (akshay kumar) डबल एक्सएल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री हुमा कुरेशी (huma kuresi) देखील दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव
रुपेरी पडद्यावर स्वत: महिला बनताच नवाजुद्दीनला समजल्या अभिनेत्रींच्या वेदना, म्हणाला, ‘आता मी पण…’
विजयने लायगरपूर्वी दिले फक्त चार ब्लॉकबस्टर चित्रपट, फ्लॉप चित्रपटाची यादी एकदा पाहा

 

हे देखील वाचा