Tuesday, July 9, 2024

शाहरुखच्या वक्तव्याने विकीच्या वडिलांना कोसळलं होतं रडू; म्हणालेले, ‘इज्जत करणं त्याच्याकडून शिकावं’

फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही राज्य करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार शाहरुख खान याचा समावेश होतो. शाहरुख हा बॉलिवूडचा एवढा मोठा अभिनेता असूनही नेहमीच चांगल्या व्यवहारासाठी ओळखला जातो. याची ग्वाही शाहरुखसोबत काम केलेला प्रत्येक व्यक्ती देतो. नुकतेच, सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर शाम कौशल यांनी एका मुलाखतीत शाहरुखचं तोंडभरून कौतुक केले.

शाम कौशल यांनी केली शाहरुखची प्रशंसा
शाम कौशल (Sham Kaushal) यांनी यादरम्यान शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याशी निगडीत अशा गोष्टी सांगितल्या, ज्या कदाचित कुणालाही माहिती नसतील. त्यांनी सांगितले की, “शाहरुख एवढा मोठा स्टार असूनही तो माझी पत्नी आणि मुलाशी ज्याप्रकारे वागला, ते पाहून मी भावूक झालो.” ते म्हणाले की, ते शाहरुखला मागील २१ वर्षांपासून ओळखतात. आम्ही दोघांनी अशोकापासून ते आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे.

आदर करणे शाहरुखकडून शिकावे
या चर्चेदरम्यान त्यांनी एका खास इव्हेंटचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान शाहरुखने सांगितलेल्या गोष्टींमुळे ते भावुक झाले होते. ते सांगतात, “कुणाचाही आदर कशाप्रकारे केला जातो, हे फिल्म इंडस्ट्रीतील लोक शाहरुख खानकडून शिकू शकतात. ज्याप्रकारे तो लोकांना भेटतो, त्यांच्याशी वागतो, त्यामुळे लोकांना खूप खास असल्याची जाणीव होते.”

शाहरुखच्या वक्तव्याने भावूक झाले होते शाम
सन २०१९मध्ये फिल्मफेअर पुरस्कारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले होते की, “जेव्हा मी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जातो, तेव्हा मला जिथेही बसण्यासाठी सांगितले जाते, तिथे मी बसतो. या पुरस्कार सोहळ्यात मी यासाठी गेलो होतो, कारण शाहरुखसोबत माझा मुलगा विकी हा शो होस्ट करत होता.” त्यांनी पुढे सांगितले की, “यादरम्यान शाहरुख ते सर्व बोलत होता, ज्या गोष्टी स्क्रिप्टमध्ये लिहिल्याच नव्हत्या. त्याने विकीकडे माझी विचारपूस केली की, ‘तुझे वडील कुठे बसले आहेत.’ त्यानंतर तो म्हणाला की, ‘जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो, तेव्हा तुझ्या वडिलांनी मला खूप काही शिकवले.'” यानंतर त्यांना विकीने सांगितले की, हे सर्व स्क्रिप्टचा भाग नव्हते. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

शाम कौशल यांचा मुलगा विकी कौशल हा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत गणला जातो. त्याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यासोबत संसार थाटला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘कच्चा बदाम’ने वेड लावणाऱ्या अंजलीने नवीन व्हिडिओ केला शेअर, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
कोट्यवधी रुपयात खेळणाऱ्या आलियाला पहिल्या सिनेमासाठी करण जोहरने दिलेले फक्त ‘एवढे’ लाख, अभिनेत्रीचा खुलासा
लिपस्टिकला हात लावल्यामुळे भडकली हिना, शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला जोरात वाजवली कानाखाली

हे देखील वाचा