नादच खुळा! विकी कौशलपेक्षा कमी नाहीत त्याचे वडील, फिटनेस पाहून तोंडात घालाल बोटे


कलाकार असो किंवा दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत असणारे सगळेच त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमीच फिटनेसचे धडे देताना दिसतात. तसेच त्यांचे जिममधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या दिवसात विकी कौशल चांगलाच प्रकाशझोतात आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहे. अशातच एक फोटो समोर आला आहे. त्या फोटोत दिसणारी व्यक्ती विकी नसून त्याचे वडील आहेत. विकीचे वडील शाम कौशल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांचा फिटनेस पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

विकी आणि कॅटरिनाच्या लग्नामध्ये त्याच्या वडिलांचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांचा जिम लूक दिसत आहे. तसेच ते सेटअप करताना आणि व्यायाम करताना दिसत आहे. या वयात त्यांचा फिटनेस पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

विकी कौशलचे वडील शाम कौशल हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले स्टंट दिग्दर्शक आहेत. त्यांनी ट्रेनिंग घेऊन १९८० मध्ये या सृष्टीत पाऊल ठेवले. त्यांनी ‘प्रहार’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. शाम कौशल यांनी ‘बाजीराव ‘मस्तानी’, ‘फॅटम’, ‘पीके’, ‘क्रिश’, ‘धूम’, ‘बर्फी’, गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रॉकस्टार’, ‘राजनीती’, ‘माय नेम इज खान’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

नुकतेच विकी आणि कॅटरिना यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचा एक फोटो त्या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या लग्नाची त्यांचे चाहते मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नव्हती, परंतु सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. मात्र, आता हे जोडपे लग्नबंधनात अडकले असून चोहोबाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!