बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने काही दिवसांपूर्वी फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी साखरपुडा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अचानक विद्युतने नंदितासोबत रोमँटिक फोटो शेअर केला आणि ही आनंदाची बातमी दिली. आता अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या योजनेबद्दल खुलासा केला आहे आणि सांगितले आहे की, त्याचे लग्न इतर लग्नांपेक्षा थोडे वेगळे असेल.
विद्युत आणि नंदिता महतानी यांचा विवाह अतिशय खास आणि अनोखा असणार आहे. याचा खुलासा स्वतः अभिनेत्याने केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना विद्युत म्हणाला की, “लग्न त्याच पद्धतीने होणार, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पण ते पारंपारिक पद्धतीने नाही होणार.”
अभिनेत्याकडे आहे शानदार आयडिया
अभिनेता म्हणाला की, “मी नियमित नाही. त्यामुळे मला नियमित असे काहीही करायचे नाही. माझ्याकडे लग्नाची तारीख नाही. मला माहित नाही की, ते कधी होणार आहे. परंतु माझ्याकडे एक आयडिया आहे, जे शानदार आणि वेगळे असेल.”
लग्न हवेत होईल का?
लग्नाचा प्लॅन सांगताना विद्युत म्हणाला की, “कदाचित आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग करण्याचा प्रयत्न करू, ते सर्व स्कायडायव्हिंग गिअरमध्ये असतील आणि ते सर्व माझ्याबरोबर उडी मारतील. हे खूप शानदार होणार आहे.”
एका क्षणात झाला साखरपुडा
नंदिता महतानीसोबत साखरपुड्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, “माझ्या भविष्यातील मागणीविषयी मी आधी कोणतीही योजना आखली नव्हती. आज मी कोण आहे, याची मी कधीही योजना आखली नव्हती. मी फक्त त्यासाठी काम करत होतो. त्याचप्रमाणे माझा साखरपुडा झाला, जे फक्त एका क्षणात झाला. मला बऱ्याच दिवसांनी दोन दिवस सुट्टी होती आणि आमच्या मनात आले की, चला करू आणि आम्ही साखरपुडा केला. आम्ही आता या सुंदर फिलिंगचा आनंद घेत आहोत.”
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर विद्युतने आतापर्यंत ‘फोर्स’, ‘स्टेनली का डिब्बा’, ‘कमांडो’, ‘बुलेट राजा’, ‘कमांडो २’ आणि ‘बादशाहो’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो येत्या काळात ‘सनक’ चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा