Saturday, July 6, 2024

जे सलमान अन् शाहरुखलाही नाही जमलं, ते विजय देवरकोंडाने करून दाखवलं, देशभरातून होतंय कौतुक

आजपर्यंत आपण ऐकले असेल की, अमुक अमुक सिनेमाने असा विक्रम केला, या गाण्याने तो विक्रम केला. मात्र, तुम्ही सिनेमाच्या पोस्टरने एखादा विक्रम केलाय, असे कधी ऐकले तर…? असा विक्रम खरोखर झालाय. हा विक्रम दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या सिनेमाच्या एका पोस्टरने केलाय. विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ‘लायगर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. नुकताच या सिनेमातील विजयचा एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरने सर्वांनाच हैराण केले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून याचे कौतुकही केले जात आहे.

पोस्टरने रचला इतिहास
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्याशी संबंधित काही हॅशटॅग्जही ट्रेंड होत आहेत. अशातच विजयच्या या न्यूड लायगर पोस्टरने (Nude Liger Poster) इतिहास रचला आहे.

पोस्टर २४ तासात झाले ट्रेंड
विजय याचा आगामी स्पोर्ट्स ऍक्शन पॅन-इंडिया सिनेमा, ‘लायगर’ सिनेमाच्या नवीन पोस्टरने देशभरात सर्वांच्याच उत्सुकता वाढवल्या आहेत. जेव्हापासून हा पोस्टर प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून प्रत्येकजण याच्याबद्दलच चर्चा करत आहे. याव्यतिरिक्त पोस्टरच्या लोकप्रियतेने आधीच नवीन विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर लगेच ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. खूप कमी काळात पोस्टर इंटरनेटवर, महिला चाहत्यांमध्ये, प्रसिद्ध कलाकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये धमाल करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

हॅशटॅग्जही झाले ट्रेंड
विजयच्या या पोस्टरमुळे #SexiestPosterEver पासून ते #DreamManVijay, आणि #HottestManAlive, #FavPosterBoy पर्यंत असे हॅशटॅग्ज शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून रविवारी सकाळी ११ नंतर भारतभरात टॉप ट्रेंडमध्ये सामील झाले. फक्त एका पोस्टरमुळे सर्वत्र उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे आता विजयच्या चाहत्यांमध्येही कमालीची वाढ झाली आहे.

अभिनेत्रींनीही केली पोस्टरची प्रशंसा
फक्त चाहत्यांनाच नाही, तर अभिनेत्रींनाही या पोस्टरने भुरळ घातली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यापासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे यांच्यापर्यंत भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींनी या पोस्टरची प्रशंसा केली.

पोस्टरचा विक्रम
या पोस्टरने आणखी एक विक्रम बनवला आहे. हे पोस्टर सर्वात वेगवान १० लाख लाईक्स मिळवणारे भारतीय सिनेमाचे पोस्टर बनले आहे. या पोस्टरने ही कमाल फक्त ४ तासात केली. विशेष म्हणजे, विजय देवरकोंडा याचा ‘लायगर’ हा सिनेमा २५ ऑगस्ट, २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहे.

हे देखील वाचा