विजय देवरकोंडाला (Vijay Devarkonda) बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ‘लायगर’ या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान विजय देवरकोंडा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जन गण मन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच अभिनेत्याचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या सुपर फॅन्सला भेटताना दिसत आहे.
विजयचा चाहत्यांना भेटतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विजय देवराकोंडाच्या फॅन पेजवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याची चाहती बोलताना दिसत आहे. गंमत म्हणजे, चाहती डॉक्टर असला तरी तिची आवड सर्वसामान्यांसारखीच आहे. (vijay deverakonda super fan started crying after meeting)
विजय देवरकोंडाच्या या सुपर फॅनचे नाव आहे, डॉक्टर चेरी. ती तिच्या सहकारी डॉक्टरांसह अभिनेत्याला भेटायला आली होती. आपला आवडता स्टार समोर पाहून ती भारावून गेली. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि रडू लागली. पण विजयने तिला कसेतरी सांभाळून घेतले.
"SUPER FAN MOMENT" – Some FANS convey their affection in a most personal way and High Respect when they ink their Star on their Body
Dr. Cherry – Hope you had best surprise meeting VD Sir and you cherish this moment@TheDeverakonda #VijayDeverakonda #TeamDeverakonda pic.twitter.com/8CuxiyJUbt
— Team Deverakonda (@TeamDeverakonda) June 30, 2022
व्हिडिओमध्ये डॉक्टर चेरी तिच्या आवडत्या स्टारसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. विजय तिला फोटो काढायला सांगतो, पण डॉक्टर चेरीला अभिनेत्याला मनापासून बघायचे आहे. फोटोसाठी पोज देण्यापूर्वी ती त्याला पाहू शकते का असे विचारते, ज्यावर विजय देवराकोंडा हसतो. मग असा क्षण येतो, जेव्हा चाहतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
पाठीवर बनवलाय टॅटू
डॉ. चेरीने विजय देवरकोंडा टॅटू तिच्या पाठीवर बनवला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सुपर फॅन मोमेंट.” या व्हिडिओला अभिनेत्याच्या चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










