Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड आख्खा देश पाहतोय ‘पुष्पा २’ची वाट, पण ‘या’ बातमीने केला चाहत्यांचा मूड ऑफ; सुपरस्टार अभिनेता बाहेर

आख्खा देश पाहतोय ‘पुष्पा २’ची वाट, पण ‘या’ बातमीने केला चाहत्यांचा मूड ऑफ; सुपरस्टार अभिनेता बाहेर

सन २०२१च्या अखेरीस म्हणजेच १७ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो सिनेमा म्हणजेच ‘पुष्पा: द राईज‘ होय. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनित या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर देशभरात एकच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ स्टाईल सर्वत्र प्रसिद्ध झाली. अजूनही या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळते. या सिनेमाने ३०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या कास्टिंगविषयीही अनेक बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी असे म्हटले जात होते की, खलनायकाच्या भूमिकेत विजय सेतुपती दिसेल. आता विजयच्या टीमने खरं काय ते सांगितलं आहे.

काय म्हणाली विजयची टीम?
साऊथचा प्रसिद्ध अभिनेता असलेल्या विजय सेतुपती (Vijay Sethupathi) याच्या टीमने स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तो सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘पुष्पा: द रूल’ (Pushpa: The Rule) या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार नाही. माध्यमांशी संवाद साधताना एका जवळच्या सूत्राने सांगितले की, विजय हा सध्या एटलीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘जवान’ या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, तो कोणत्याही इतर तेलुगू प्रोजेक्टमध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार नाहीये.

माध्यमांनी असे सांगितले होते की, विजय सेतुपती हा ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) या प्रसिद्ध सिनेमाच्या सीक्वेलसाठी निवडले गेले आहे. तसेच, काही काळापूर्वी एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक सुकुमार यांनी खुलासा केला होता की, त्यांनी ‘पुष्पा: द रूल’चे काही भाग शूट केले होते, पण त्यांना आता ते पुन्हा शूट करावे लागतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

काय म्हणाले होते सुकुमार?
सुकुमार म्हणाले होते की, “मला संपूर्ण सिनेमाची शूटिंग करावी लागेल.” सुकुमार यांनी या चर्चेदरम्यान सांगितले होते की, त्यांना १६ डिसेंबर, २०२२ रोजी सिनेमा प्रदर्शित करायचा होता. अगदी त्याचप्रकारे, जसा त्यांनी १७ डिसेंबर, २०२१ रोजी ‘पुष्पा: द राईज’ सिनेमा प्रदर्शित केला होता. आता दोन्ही कलाकारांनी आपली बाजू मांडल्यानंतर असे दिसते की,  कदाचित विजयच्या अनुपस्थितीमुळे सुकुमार यांनी पुन्हा एकदा हा सिनेमा शूट करण्याबाबत बोलत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
अगगं! फोटोग्राफरला थेट बाथरूममध्ये घेऊन गेली ‘ही’ अभिनेत्री, अंघोळ करतानाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल
टायगर- दिशाच्या ब्रेकअपमागे ‘या’ अभिनेत्रीचा हात? जाणून घ्या खरं काय ते
राकेश झुनझुनवालांची भूमिका साकारून रातोरात स्टार बनला होता ‘हा’ अभिनेता, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

हे देखील वाचा