Friday, July 5, 2024

‘फक्त सेक्स आणि शिव्या…’, ओटीटी कंटेंटबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याची मोठी प्रतिक्रिया

काळानुसार प्रेक्षकांच्या आवडी-निवडींमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक ओटीटीकडेही वळले आहेत. प्रेक्षकांची आवड ओळखून ओटीटी प्लॅटफॉर्म नवनवीन वेबसीरिज आणि सिनेमे घेऊन येत आहेत. ओटीटीचा एक फायदा असा की, ओटीटीला सेन्सॉर बोर्ड नाहीये. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या आवडीचा कंटेट तयार करतात. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. मात्र, आता ओटीटी कंटेंटमधील बदलावर बॉलिवूड अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे हृदय जिंकले आहे. विक्रांत अनेक सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये झळकला आहे. त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. तो नुकताच ‘फॉरेन्सिक’ सिनेमात झळकला, ज्यामध्ये त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

ओटीटीविषयी काय म्हणाला विक्रांत?
विक्रांत याने जेव्हा आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती, तेव्हापासून आतापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्म आणि त्यावरील कंटेंटमध्ये खूप बदल पाहायला मिळाला आहे. मेस्सीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ओटीटीमधील बदलावर आपले मत मांडले.

तो म्हणाला की, “जेव्हा त्याने अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती, तेव्हा खूप कमी प्लॅटफॉर्म होते. त्यावेळी ओटीटीवरील सर्व कंटेंट वल्गर भाषेतील आणि अधिक सेक्स सीन्स असणारा होता. मात्र, आता ओटीटी एका नवीन आकारात येत आहे.”

ओटीटीमध्ये किती झालाय बदल?
विक्रांत म्हणाला की, “लोकांना समजत नव्हते की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तशाप्रकारच्या कंटेंटवर कशाप्रकारे प्रतिक्रिया द्यावी. तसेच, अनेकदा ते बोर होत होते. मात्र, आता ओटीटीची एक रचना आणि व्यावसायिकपणा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आणि यासाठी मला खूप चांगले वाटत आहे.” हे वृत्त न्यूज १८ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

विक्रांत मेस्सीविषयी थोडंसं
विक्रांत मेस्सी याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ३ एप्रिल, १९८७मध्ये मुंबईत जन्मलेल्या विक्रांतने २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘लुटेरा’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘दिल धडकने दो’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘छपाक’, ‘मिर्झापूर’, ‘हसीन दिलरुबा’ यांसारख्या सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

‘या’ दिग्दर्शकापुढे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीही बोलती व्हायची बंद, वाचा गाजलेला किस्सा

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा