प्रत्येक गुन्हेगाराचा पडदा फाश करायला येतायेत विक्रांत मेस्सी- राधिका आपटे; ‘फॉरेन्सिक’ चित्रपटाचं पोस्टर झालं लॉन्च


बॉलिवूडमध्ये अनेक नवनवीन चित्रपट बनत आहे. तोच रोमान्स आणि तीच ऍक्शन सोडून आता काही नवीन कथांवर आधारित चित्रपट बनत आहेत. अशातच विक्रांत मेस्सी आणि राधिका आपटे स्टारर ‘फॉरेन्सिक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर मंगळवारी (२७जुलै) प्रदर्शित झाला आहे. याची माहिती अभिनेता विक्रांत मेस्सी याने सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

विक्रांतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘फॉरेन्सिक’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये भिंगातून एका व्यक्तीच्या बोटाचे ठसे दिसत आहेत. हा पोस्टर शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आता कोणतीच न सोडवलेली केस राहणार नाही. #फॉरेन्सिक करणार प्रत्येक गुन्हेगाराचा पडदा फाश.” हा एक गुन्हेगाराचा शोध घेणारा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी हा फॉरेन्सिक ऑफिसरच्या मुख्य भूमिकेत असणार आहे. हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असणार आहे. तो चित्रपट देखील ‘फॉरेन्सिक’ या नावानेच प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरीया हे आहेत. तसेच मानसी बगला आणि वरुण बगला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. विक्रांतने शेअर केलेल्या या पोस्टरला चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्याचप्रमाणे राधिका आपटेने देखील या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. (Vikrant Massey and Radhika Aapate starer forensic movie release soon)

विक्रांत मेस्सीने या आधी ‘हसीन दिलरूबा’ आणि ‘१४ फेरे’ या चित्रपटात काम केले आहे तर राधिकाने ‘काबिल’, ‘हंटर’, ‘पॅडमॅन’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने अनेक वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.