Monday, July 1, 2024

Happy Birthday | छोट्याशा कारकिर्दीत विनोद मेहरा यांनी १००हून अधिक चित्रपटांत केलं काम, ‘असा’ होता जीवनप्रवास

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अल्पावधीत आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले होते. त्यांचे आयुष्य कमी होते मात्र आपल्या दमदार अभिनयाने त्याच्या भूमिका कायमच्या प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या. यांपैकीच एक कलाकार म्हणजेच विनोद मेहरा. विनोद मेहरा यांनी वयाच्या ४५ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. रविवारी (१३ फेब्रुवारी) विनोद मेहरा यांचा वाढदिवस. या निमित्ताने पाहूया त्यांचा जीवन प्रवास.

विनोद मेहरा (Vinod Mehra) हे हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते होते. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दित त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचे अनेक चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. विनोद मेहरा यांचा प्रवास जरी छोटा असला, तरी त्यांनी अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

त्यांच्या चित्रपटांइतकेच त्यांचे खासगी आयुष्यही कायम चर्चेत राहिले. त्यांनी मीना ब्रोकासोबत विवाह केला होता. लग्नानंतर काही वर्षांनी विनोद मेहरा यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर मीना आणि विनोद यांच्यात सतत वाद होऊ लागले. त्यानंतर विनोद यांनी बिंदी गोस्वामीसोबत दुसरे लग्न केले. मात्र त्यांचे हे नाते सुद्धा फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न उद्योजकाची मुलगी किरणसोबत केले. मात्र या लग्नानंतर त्यांच्या आयुष्याचा प्रवासच थांबला. विनोद मेहरा यांचे याच काळात दुःखद निधन झाले.

त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना दोन लहान मुले होती. आता रोहन आणि सोनिया दोघेही अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. विनोद मेहरा आणि रेखा यांच्या प्रेम प्रकरणाची सुद्धा त्या काळात जोरदार चर्चा झाली होती. इतकेच नव्हे, तर दोघांनी लग्न सुद्धा केले होते. मात्र विनोद यांच्या आईला रेखा आवडत नव्हती, त्यामुळे तिला घरातून हाकलून दिले.

हेही पाहा- एकही सिनेमा एकत्र न करता अशी फुलली vicky kaushal आणि katrina kaif ची lovestory

विनोद मेहरा यांचे चित्रपट क्षेत्रातील काम मात्र यशस्वी राहिले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांनी आपल्या छोट्याश्या काळात तब्बल १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. १९७१ मध्ये त्यांनी ‘रीता’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरवात केली. त्यांचे अनेक चित्रपट आजही आवडीने पाहिले जातात.

हेही पाहा

हे देखील वाचा