Thursday, March 30, 2023

Happy Birthday | कित्येक वर्षे आईशीच केलं होतं रश्मीने बोलणं बंद, स्वत: सांगितलं कारण

रश्मी देसाई (Rashami Desai) ही हिंदी टीव्ही मालिकांची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाची, भूमिकेची नेहमीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. रश्मीची मालिका क्षेत्रातील कामगिरी जितकी यशस्वी आहे, तितकेच तिचे खासगी आयुष्य सुद्धा संघर्षाचे राहिले आहे. साेमवारी 13 फेब्रुवारी रश्मी तिचा वाढदिवस साजरा करते. या निमित्ताने जाणून घेऊ या तिच्या आयुष्यातील एक वाईट किस्सा...

रश्मी देसाई आपल्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीमुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. ‘उतरन’ मालिकेतील दमदार भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिच्या सौंदर्याचे अभिनयाचे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. रश्मीचे पडद्यावरील आयुष्य यशस्वी झाले, याउलट तिला खऱ्या आयुष्यात मात्र खूप संघर्ष करावा लागला. तिच्यात आणि तिच्या आईमध्ये खूप मतभेद झाले होते. त्याचबरोबर रश्मीच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र तरीही सगळ्या संकटावर मात करत ती आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

एका मुलाखतीत बोलताना रश्मीने तिच्या आणि आईच्या नात्यात आलेल्या दुराव्याची गोष्ट सांगितली होती. तिने सांगितले, “माझ्यामध्ये आणि आईमध्ये मोठे वाद झाले. हे वाद इतके वाढले की आमचे बोलणे सुद्धा बंद झाले होते. या संकटाच्या वेळी मला जीव लावायला कोणीतरी हवं होतं. मला आपलं म्हणणारं, माझी काळजी करणारं त्या काळात माझ्याकडे कोणी नव्हतं. माझ्यावर खूप जबाबदारी होती आणि मला ती पार पाडायची होती. बिग बॉसच्या कार्यक्रमाने मला सगळे दिले. माझ्यात आणि आईमध्ये झालेले वादसुद्धा मिटले.”

माझ्या कुटुंबाने मला समजून घेत पुन्हा पहिल्यासारखे बोलायला लागले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे असेही ती यावेळी म्हणाली. तत्पूर्वी रश्मी देसाई ‘बिग बॉस’च्या 15 व्या पर्वातसुद्धा सहभागी झाली होती. यावेळी तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्या आईने घरात प्रवेश केला होता. रश्मीने ‘दिल से दिल तक’, ‘अधूरी कहाणी हमारी’, ‘इश्क का रंग सफेद’, अशा अनेक मालिका केल्या आहेत.(tv actress rashmi desai birthday special know about her)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

शिव ठाकरे ‘बिग बॉस’ विजेता व्हावा म्हणून अमरावतीमध्ये केली जातेय प्रार्थना अन् होम-हवन, वाचा बातमी

हे देखील वाचा