Tuesday, July 9, 2024

भोजपुरी चित्रपटाचा स्टार यश कुमार अडकला नवीन नात्यात, सहकलाकार निधी झासोबत केली एंगेजमेंट

अनेकदा कलाकार त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या लव्हलाईफसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. अशाचप्रकारे भोजपुरी स्टार अभिनेता आणि गायक यशच्या लव्हलाईफच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. निधी झा आणि यश खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. निधी झाच्या वाढदिवसानिमित्त यशने तिला एक कार गिफ्ट केली. ज्यासाठी निधीने यशचे आभार मानले आणि आय लव्ह यू देखील म्हटले आहे. हे दोन लव्हबर्ड्स अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर येतात. आता या दोघांनी एंगेजमेंट केल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या एंगेजमेंटचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यश कुमार (Yash Kumar) आणि अभिनेत्री निधी झा (Nidhi Jha) यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत एंगेजमेंट केली. त्यांच्या एंगेजमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे कुटुंबात एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि घोषणा केली की, तो आता अधिकृत आहे. व्हिडिओ शेअर होताच लव्हबर्ड्सवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. चाहत्यांशिवाय भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकारांनीही या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओसोबत, तिने लिहिले की, “हे अधिकृत आहे…आम्ही एंगेज आहोत #NemoNikkuForever.”

दोघांनी अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि ते ऑन-स्क्रीन जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भोजपुरी व्यतिरिक्त निधी झा काही हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये देखील दिसली आहे.

आता दोघांचीही एंगेजमेंट झाली आहे, मग ते लग्न कधी करणार असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. चाहते आपापल्या परीने दोघांचेही त्यांच्या एंगेजमेंटबद्दल अभिनंदन करत आहेत. या एंगेजमेंट दरम्यान निधीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, तर यश काळ्या रंगाचा कोट-पँटमध्ये दिसत आहे. यशने गुडघ्यावर बसून निधीला एंगेजमेंट रिंग घातली. यावेळी दोघांनी केकही कापला.

दोघांचे अनेक चित्रपट येणार आहेत एकत्र

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर यश आणि निधी झा ‘घरवाली बहरवाली २’, ‘दंडनायक’, ‘परशुराम’, ‘लाडो’, ‘बेटी नंबर २’ आणि ‘थोडा गुसा थोडा प्यार’ सारख्या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा