शाळेमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला शिक्षिकेनं मुस्लिम मुलाला त्याच्याच वर्गातील मुलांना मारायला सांगितले आहे. इतकचं नाही तर त्यामुलाला नको ते शब्द बोलली आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतप्त व्यक्त केला आहे. यावर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि रेणुका शहाणे यांच्यासह अनेक स्टार्सनी ट्विटद्वारे या धक्कादायक घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
हा व्हिडिओ एका खाजगी शाळेच्या शिक्षकाने वर्गातील मुलांना त्यांच्या मुस्लिम वर्गमित्रांना चापट मारयला लावली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, मुले रडणाऱ्या विद्यार्थ्याला मारत असताना शिक्षक तिथेच उभे होते.
ही घटना व्हायरल झाली असून बॉलिवूड सेलिब्रिटींसह लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेचा आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतर शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाल हक्क आयोगानंदेखील शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
That vile teacher should be behind bars! Instead, she might just get a national teacher’s award for promoting national integration! Kafkaesque!! Cry, my beloved country ????
— Renuka Shahane (@renukash) August 25, 2023
याप्रकरणी रेणुमा शहाणे यांनी ट्विट करत लिहिले की, ” त्या शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी आणि तुरुंगात ठेवावे.” तर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विट करून या घटनेवर आपले मतही मांडले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आपण मानवतेच्या अंधाऱ्या बाजूकडे वाटचाल करत आहोत, तुम्हाला काळजी वाटत नाही का?”
स्वरा भास्करनेही शिक्षिकेच्या अटकेवर आपले मत व्यक्त केले आणि लिहिले की, “मुझफ्फरनगरमधील पीडित मुलाच्या वडिलांना तृप्ता नावाच्या शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई करणार नाही, असे लिहून आणि स्वाक्षरी करून घेणे हा केवळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. पोस्को कायद्यांतर्गत हा गंभीर गुन्हा केल्याचे पुरावे आहेत. मुझफ्फरनगर पोलीस तुमचे काम करतात.” हा व्हिडिओ तूफान व्हीयर होत आहे. (Actors Prakash Raj and Renuka Shahana react to the viral video of a student being brutally beaten up in a private school)
अधिक वाचा-
–इंजिनिअरिंग सोडून अभिनयात आली, अभिनेत्री सुचित्रा पल्लईचा सिनेसृष्टीचा प्रवास वाचून व्हाल थक्क
–लग्नात गाणे गाऊन मुकेश यांना मिळाली चित्रपटात गाण्याची पहिली संधी, मोतीलाल यांनी दिली दिशा