Tuesday, March 5, 2024

पडद्यावरील खलनायक ‘असा’ बनला अभिनेत्री रेणुका शहाणेच्या जीवनातील नायक; पत्राद्वारे जिंकलं होतं मन

आशुतोष राणा हे बॉलिवूडचे नामांकित अभिनेता आहेत, ज्यांनी आपल्या अनोख्या अभिनयाच्या जोरावर स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. हेच कारण होते, ज्यामुळे ते ९०च्या दशकात खलनायक म्हणून नायकाला टक्कर देत असत. त्यावेळी प्रत्येक दिग्दर्शक आशुतोष यांना, त्यांचा चित्रपट जिवंत दाखवण्यासाठी कास्ट करायचे.

आशुतोष यांना त्याच्या कारकीर्दीत जेवढे यश मिळाले, तितकाच आनंद त्यांना वैयक्तिक जीवनातही मिळाला. या अभिनेत्याने २००१ मध्ये अभिनेत्री रेणुका शहाणेशी लग्न केले होते. आज त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस आहे.

रेणुकाची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुशिक्षित अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने सेंट झेवियर कॉलेजमधून कला आणि नंतर मुंबई विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. आशुतोष आणि त्यांची पत्नी रेणुका शहाणे यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे.

https://www.instagram.com/p/BzqT4L8JznZ/?utm_source=ig_web_copy_link

अशी झाली होती पहिली भेट
आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्यातील संभाषणाची सुरुवात एका फोन कॉलपासून झाली होती आणि एक मजेची गोष्ट म्हणजे, दोघांनी पहिल्याच वेळी बर्‍याच गप्पा मारल्या. आशुतोष राणांनी एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची प्रेमकथा सांगितली होती. यात त्यांनी उघड केले होते की, ते दोघे पहिल्यांदा कसे भेटले.

आशुतोष म्हणाले होते की, हंसल मेहता यांचा पहिला चित्रपट ‘…जयते’च्या प्रिव्ह्यू वेळी ते रेणुकाला पहिल्यांदा भेटले होते. कारण ते रेणूकाच्या उत्तम अभिनयाचे प्रशंसक होते.

https://www.instagram.com/p/CAmbgapgafy/?utm_source=ig_web_copy_link

प्रेम व्यक्त करण्यासाठी निवडला दसरा
पहिल्या भेटीत अर्ध्या तासाच्या संभाषणादरम्यान, आशुतोष राणा रेणुकाच्या विचारांनी प्रभावित झाले. यानंतर, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी अधिक वाट न पाहता, एक चांगली संधी शोधत होते. यासाठी त्यांनी दसऱ्याच्या दिवसाची निवड केली आणि शुभेच्छा देण्यासाठी रेणुकाला फोन केला.

असा मिळाला वैयक्तिक नंबर
इथूनच शुभेच्छा आणि बऱ्याच गप्पा सुरू झाल्या, मग हळूहळू प्रकरण पुढे सरकले. अशाप्रकारे, लँडलाईनवरुन त्यांना रेणुकाचा वैयक्तिक मोबाइल नंबर मिळाला. मग काय! दोघांमधील फोनवरील गप्पा जवळपास तीन महिन्यांपर्यंत चालूच होत्या. मग आशुतोष राणा यांनी वेळ वाया न घालवता, रेणुकाला प्रपोज करण्याचा विचार केला. यासाठी आशुतोष यांनी एक कविता लिहिली, जेणेकरून उत्तर जरी नाही आले, तरी त्रास होऊ नये.

https://www.instagram.com/p/CM9wzd0JDmB/?utm_source=ig_web_copy_link

लव्हलेटरद्वारे व्यक्त केले प्रेम
आशुतोष राणा यांनी आपल्या पत्रात लिहिले, ‘‘प्रिये लिखकर, मैं नीचे लिख दूं नाम तुम्हारा, कुछ जगह बीच में छोड़ दूं…नीचे लिख दूं ‘सदा तुम्हारा’, लिखा बीच में क्या यह तुमको पढ़ना है, कागज पर मन की परिभाषा का अर्थ समझना है, जो भी अर्थ निकलोगी तुम वह मुझको स्वीकार है, झुके नयन, मौन अधर या कोरा कागज अर्थ सभी का प्यार है.”

https://www.instagram.com/p/CLQYSc2AbX6/?utm_source=ig_web_copy_link

रेणुका शहाणेने आशुतोष राणांचा प्रस्ताव मान्य केला आणि दोघांनी २५ मे २००१ रोजी आशुतोषच्या गावी दमोहला लग्न केले. या जोडप्याला शौर्यमान आणि सत्येंद्र अशी दोन मुले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र
‘ये काली काली आँखें…’ दीपिकाचा लेटेस्ट फाेटाेशूट पाहिलात का?

हे देखील वाचा