आता २०२१ हे वर्ष संपलंय. अशा स्थितीत आता पुन्हा एकदा सगळेजण फ्लॅशबॅकमध्ये जातायत. एकीकडं हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अनेक अर्थानी चांगलं ठरलंय, तर दुसरीकडं हे वर्ष निराशेचंही होतं. या वर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार कायमचं हे जग सोडून गेले. आपण अशाच कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
दिलीप कुमार
‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांनी यावर्षी ७ जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांपासून ते दिग्गज अभिनेत्यांपर्यंत सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. खुद्द ‘ही मॅन’ धर्मेंद्र म्हणाले होते, “सायरा यांनी जेव्हा म्हटले की, धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले आहेत.’ मित्रांनो, जीवच गेला माझा. देवा माझ्या प्रिय भावाला स्वर्ग लाभो.”
सिद्धार्थ शुक्ला
पुढील अभिनेता म्हणजे टेलिव्हिजन गाजवणारा आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला. त्याच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन जगताला आणि त्याच्या चाहत्यांना धक्काच दिला होता. यावर्षी २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अभिनेत्याच्या तरुण वयात झालेल्या या मृत्यूनं सर्वांनाच हादरवून सोडलं होतं.
सुरेखा सिक्री
लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’मध्ये आजी म्हणून सर्वांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री सुरेखा सिक्रींचाही यात समावेश होतो. त्यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं होतं. सुरेखांचं यावर्षी १६ जुलैमध्ये निधन झालं होतं. ‘बालिका वधू’ व्यतिरिक्त सुरेखा ‘परदेस में है मेरा दिल’ आणि ‘एक था राजा एक थी रानी’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसल्या. यानंतर त्या शेवटच्या २०२० मध्ये आलेल्या ‘घोस्ट स्टोरीज’ या चित्रपटात दिसल्या होत्या.
घनश्याम नायक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालचं दुकान सांभाळणाऱ्या नट्टू काकांचं याचवर्षी ३ ऑक्टोबर निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांची मनं तुटली. खुद्द ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “नट्टू काका दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दोन ऑपरेशनही झाले होते. वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते. पण ते सुरुवातीपासून आतापर्यंत तारक मेहताच्या टीमचा एक भाग होते.”
बिक्रमजीत कंवरपाल
अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचा यावर्षी १ मे रोजी कोरोनामुळं मृत्यू झाला होता. ते ५२ वर्षांचे होते. कंवरपाल यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर २००३ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी ‘आरक्षन’, ‘मर्डर २’, ‘द गाजी ॲटॅक’ यांसारख्या सिनेमात काम केलं होतं.
अनुपम श्याम
स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘मन की आवाज प्रतिज्ञा’मध्ये ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अनुपम श्याम यांनीही याच वर्षी जगाचा निरोप घेतला. किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या या अभिनेत्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं.
अरविंद त्रिवेदी
रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध पौराणिक कार्यक्रम ‘रामायण’मध्ये रावणाची सशक्त व्यक्तिरेखा साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनीही यावर्षी जगाचा घेतला. या अभिनेत्याचं ६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं होतं.
युसूफ हुसैन
प्रसिद्ध टीव्ही आणि सिनेअभिनेते युसूफ हुसैन यांचं यावर्षी ३० ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांचे जावई हंसल मेहता यांनी याबाबत माहिती दिली होती.
अमित मिस्त्री
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांनीही यावर्षी या जगाचा निरोप घेतला. ४७ वर्षीय अमित यांचा २३ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार
हिंदी सिनेमे, नको रे बाबा! एक- दोन नाही, तर तब्बल १० चित्रपटांनी केला प्रेक्षकांचा मूड ऑफ
फॅमिली मॅन ते मनी हाईस्ट, २०२१ मध्ये ‘या’ १० वेबसीरिजने केल्या चाहत्यांच्या बत्त्या गुल