Wednesday, December 6, 2023

…म्हणून तुटलं होतं दिलीप कुमार अन् मधुबालाचं नातं, थेट कोर्टात दिली अभिनेत्रीविरुद्ध साक्ष

हिंदी चित्रपट जगतात अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या प्रेमाला त्यांचं गंतव्यस्थान मिळू शकलं नाही. अशीच एक सुंदर जोडी दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबालाची (Madhubala) आहे. बॉलिवूडच्या विश्वात एक काळ असा होता, जेव्हा दोघांच्या प्रेमकथा चर्चेत असायच्या. मात्र, मधुबालावर खूप प्रेम करूनही एकदा दिलीप कुमार यांनी तिच्याविरोधात कोर्टात साक्ष देखील दिली आहे.

का दिली साक्ष?
खरं तर, दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा मधुबालाचे वडील होते. ते नेहमी दोघांच्या प्रेमाच्या विरोधात होते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांना ‘नया दौर’ या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले, तेव्हाची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ‘नया दौर’चे शूटिंग मुंबईबाहेर करायचे होते. पण मधुबालाच्या वडिलांना तिला दिलीप कुमारसोबत शूटिंगसाठी शहराबाहेर पाठवायचे नव्हते. यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे मधुबालाच्या जागी वैजयंती माला (Vaijayanti Mala) यांना कास्ट करण्यात आले. यासह बीआर चोप्रा यांनी मधुबालाविरुद्ध तीस हजार रुपयांच्या नुकसानीचा दावा दाखल केला. खटल्यात दिलीप कुमार यांनी अभिनेत्री आणि तिच्या वडिलांविरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. (dilip kumar and madhubala relationship was broken because of this)

दिलीप कुमार यांना मधुबालाने केली विनंती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मधुबालाने दिलीप कुमार यांना त्यांचे नाते वाचवण्यासाठी वडिलांची माफी मागण्याची विनंती केली होती. परंतु दिलीप कुमार यांनी मधुबालाची आज्ञा मानण्यास नकार दिला. यानंतर दोघांचे नाते अपूर्ण राहिले. दिलीप कुमार यांनी अभिनेत्री सायरा बानोसोबत (Saira Banu) लग्न केले. तर तिकडे मधुबालाने गायक किशोर कुमारला (Kishore Kumar) आपल्या आयुष्याचा साथीदार बनवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, १३ वर्षे…
बंगाली अभिनेत्रीमुळे मिळाला बॉलिवूडचा पहिला ‘ग्लॅमर’ चेहरा! दिलीप कुमार यांच्याशी होते खास नाते

 

हे देखील वाचा