चांगल्या- वाईट आठवणी देऊन २०२१ या वर्षाने निरोप घेतला. मात्र, असं असलं तरीही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी हे वर्ष खास ठरलं. आता तुम्ही म्हणाल, कसं काय? तर या वर्षात अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली, तर काहींनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळं चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झालेला. कलाकारांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता आपण या वर्षात लग्न झालेल्या अशाच काही जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
वरुण धवन आणि नताशा दलाल
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांनी यावर्षीच २४ जानेवारी संसार थाटला. अलिबागच्या ‘द मॅन्शन हाऊस’ या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. वरुण- नताशा यांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नयेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला होता. लग्नात कोणालाही आतमध्ये फोन नेण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली नव्हती.
View this post on Instagram
दिया मिर्झा आणि वैभव रेखी
सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत १५ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वैभव हा पेशानं यशस्वी व्यावसायिक. दिया आणि वैभव दोघंही घटस्फोटीत असून त्यांचं हे दुसरं लग्न. कुटुंबातील खास सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. दिया-वैभवचे लग्न एका महिला पंडितानं केलं होतं. दिया लग्नाअगोदरच गरोदर होती. तिनं लग्नानंतर चार महिन्यांनी म्हणजे १४ मे रोजी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव आहे अव्यान आझाद.
View this post on Instagram
यामी गौतम आणि आदित्य धर
अभिनेत्री यामी गौतमनं ४ जून रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली. यामीचा पती आदित्य धर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्यनंच केलं होतं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. दिग्दर्शक म्हणून आदित्यचा हा पहिलाच चित्रपट होता.
View this post on Instagram
राजकुमार राव आणि पत्रलेखा
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनीदेखील या वर्षीच संसार थाटला. बॉलिवूडमधील या जोडप्याचा चंदीगडमध्ये १५ नोव्हेंबरला लग्नसोहळा पार पडला. तब्बल ११ वर्षांच्या मैत्रीला त्यांनी नवे नाव देऊन नवीन प्रवास सुरू केला.
View this post on Instagram
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ नुकतेच लग्नबंधनात अडकले. ९ डिसेंबरला राजस्थानच्या बरवाडातील सिक्स सेंन्स फोर्टमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर ते दोघेही मालदीवला हनीमूनसाठी रवाना झाले होते.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे
छोटा आणि मोठा दोन्ही पडद्यावर अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे १४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकली. तिचं लग्न व्यावसायिक विकी जैनसोबत झालं. त्यांनी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केलं होतं.
View this post on Instagram
मराठमोळ्या लूकमध्ये अंकितानं तिचे फोटो शेअर केले होते. तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हिंदी सिनेमे, नको रे बाबा! एक- दोन नाही, तर तब्बल १० चित्रपटांनी केला प्रेक्षकांचा मूड ऑफ
फॅमिली मॅन ते मनी हाईस्ट, २०२१ मध्ये ‘या’ १० वेबसीरिजने केल्या चाहत्यांच्या बत्त्या गुल
जगभरात गाजणाऱ्या ‘या’ कोरियन वेबसीरिज तुमच्याही डोक्याला देतील शॉट