जगभरात गाजणाऱ्या ‘या’ कोरियन वेबसीरिज तुमच्याही डोक्याला देतील शॉट

0
414
Korean-Webseries
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Netflix

सध्या हिंदी वेबसीरिज तर आपण पाहतोयच, तसेच मराठीतील वेबसीरिजलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. जसे की, समांतर. पण आता अशीच काही क्रेझ कोरियन वेबसीरिजचीही पाहायला मिळतेय. कोरियन वेबसीरिजनं तर आख्ख्या जगाला वेड लावलंय. आपण २०२१ मध्ये आलेल्या अशाच काही कोरियन वेबसीरिजबद्दल जाणून घेणार आहोत. याबद्दल वाचल्यानंतर तुम्हीही त्या पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक व्हाल.

स्क्विड गेम
यादीत अव्वल क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे जगाला वेड लावणाऱ्या स्क्विड गेमचं. २०२१ मध्ये आलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेबसीरिजने नेटफ्लिक्सचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. या सीरिजचा एवढा परिणाम झाला की, सीरिजचा शेअर मार्केटपासून ते ऑनलाईन मार्केटपर्यंत परिणाम दिसून आला.

हेलबाउंड
पुढील वेबसीरिज म्हणजे ‘हेलबाउंड.’ १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या कोरियन वेबसीरिजने लोकांना अक्षरशः वेड लावले. ही कहाणी एका विद्यार्थ्याची आहे. जो कोणत्या तरी कारणाने अपराधाच्या दुनियेत पाऊल ठेवतो. परंतु त्याचे हे रहस्य त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांना समजते. नेटफ्लिक्सवरील ही वेबसीरिज खूप चर्चेत राहिलीय. प्रेक्षकांनाही ही वेबसीरिज खूप आवडली.

माय नेम
यादीतील तिसरी वेबसीरिज आहे ‘माय नेम.’ कोरियन क्राईम थ्रिलर ‘माय नेम’ या वेबसीरिजने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही कहाणी एका तरुण मुलाची आहे. ज्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी तो प्रयत्न करत असतो.

विन्संझो
नेटफ्लिक्सवरील ‘विन्संझो’ या कोरियन वेबसीरिजनंही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, या वेबसीरिजनं बेस्ट ड्रामा सीरिजचा अवॉर्डही पटकावलाय. यामधील कलाकारांच्या केमिस्ट्रीने तर चाहते घायाळ झालेले.

लव्ह अलार्म २
तब्बल चार वर्षानंतर ‘लव्ह अलार्म २’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन आलाय. यात लव्ह ट्रँगल दाखवलाय. प्रेक्षकांना देखील या वेबसीरिजनं वेड लावलंय.

होम टाऊन चाचाचा
पुढील वेबसीरिजचा जॉनर हा आजच्या तरुणाईत चांगलाच प्रसिद्ध आहे. तो म्हणजे रोमँटिक. ‘होम टाऊन चाचाचा’ या रोमँटिक कोरियन वेबसीरिजने तरुणाईला भुरळ घातलीय. ही साऊथ कोरियन ‘मिस्टर हाँग’चा रिमेक आहे.

नेवर्थलेस
‘नेवर्थलेस’ ही वेबसीरिज कॉलेजच्या दोन विद्यार्थ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यांना एका सिरियस रिलेशनशिपपासून लांब राहायचे असते. परंतु हे करताना ते एकमेकांकडे आकर्षित होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here