Saturday, June 29, 2024

असे कलाकार ज्यांच्यावर बनू शकतो एखादा चित्रपट, पाहा कोण-कोण आहेत ‘ते’ दिग्गज

मंडळी प्रत्येकाचं आयुष्याची काहीतरी कहाणी असतेच नाही का… तुम्ही तुमचाच एकदा विचार करून पाहा. कधी कधी आपण स्वत:ला एखादा सिनेमा किंवा मालिका पाहाताना एखाद्या पात्राच्या रुपातही पाहातोच की, कधीकधी त्यामुळे ते पात्र आपल्या जवळचंही बनतं. आता तर सध्या बायोपिकचा जमानाय असं म्हणायलाही हरकत नाही, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांवर आत्तापर्यंत चित्रपट येऊन गेलेत. तसंही एकदा का एखादा व्यक्ती सेलिब्रेटी झाला की, त्याच्याबद्दल सर्व गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतातच, बरोबरना. त्यातही जर तो एखादा अभिनेता किंवा खेळाडू असेल, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचे मोठे आकर्षण तर दिसून येतेच. यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे त्यावर येणारा बायोपिक. बायोपिक म्हणलं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर टाकलेली एक नजर असते. आजपर्यंत आपण अनेक असे बायोपिक पाहिलेही असतील. पण आज आपण  त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्यावर भविष्यात बायोपिक येऊ शकतात.

अभिनेत्री रेखा- पडद्यावर जितका सहजसुंदर अभिनय रेखाचा राहिला, तेवढं तिचं आयुष्य साधं आणि सरळ राहिलं नाही. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले, तिच्या सौंदर्याने अनेक तरुणांना भुरळ घातली होती. तीला आजही भारतीय सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेंत्रींच्या यादीत स्थान मिळते. पहिल्याच चित्रपटादरम्यान विनयभंग झाल्यानंतरही तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची धमक दाखवली होती. त्यातच तिचे नाव अनेक अभिनेत्यांबरोबरही जोडले गेले. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील किस्से तर आजही सांगितले जातात. तिच्या नवऱ्याने आत्महात्याही केली होती. त्याचमुळे पडद्यावर सर्वांना आवडणाऱ्या रेखाचे आयुष्य काही सिनेमापेक्षा कमी नाही. त्याचमुळे तिच्या आयुष्यावर चित्रपट आल्यास तो पाहाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतील.

परविन बाबी –  बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ट्रॅजिक स्टोरी कोणाची राहिली असेल तर त्यात परविन बाबीचे नाव नक्की येईल. ७०-८०च्या दशकात आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत वर्चस्व गाजवलेल्या परविन बाबीच्या बाबतीत अनेक वादही झाले. तिचे नाव कबीर बेदी, डॅनी, महेश भट यांच्याशी जोडले गेले. पण ती अखेरपर्यंत अविवाहीत राहिली. तिला पॅरानॉईड सीजोफ्रेनिया नावाचा आजार झाला होता, या आजारात कल्पित घटनाही सत्य वाटायला लागतात. याच आजारामुळे तिने अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. अखेर २००५ मध्ये ती जग सोडून गेली.

शाहरुख खान –दिल्लीतील सामान्य घरातील एक मुलगा ऍक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईला आला. संघर्ष केला. मालिकांमध्ये कामं केली आणि अखेर मेहनतीचं फळ मिळालं आणि चित्रपटांत कामं मिळू लागली. मग काय शाहरुखने मागे वळून पाहिलंच नाही. त्याने त्याची वेगळी छाप बॉलिवूडमध्ये पाडली. तो रोमँटिक, ऍक्शन चित्रपटात दिसला. सकारात्मक भूमिकेत हिरो म्हणून पुढे येत असताना त्याने नकारात्मक भूमिकेलाही कधी नाही म्हटले नाही. म्हणून डर, बाजीगर आशा त्याची नकारात्मक भूमिका असलेले चित्रपट गाजलेही. आज शाहरुख बॉलिवूडचा बादशाह असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा हा खराखुरा प्रवास चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल.

अमिताभ बच्चन- बिग बी म्हणून चित्रपट सृष्टीत त्यांची ओळख आहे. भारदस्त आवाज आणि लाजवाब अभिनय या जोरावर आजूनही अमिताभ सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. गेल्या कित्येक दशकात त्यांनी एक आदर्श अभिनेत्याचे उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे. पण अमिताभ यांच्याही आयुष्यात त्यांना सर्वकाही सहज मिळालं असं नाही, पण त्यांनी केलेली मेहनत आणि आपल्या कर्तृत्वावर यशाचे उच्च शिखर गाठले. त्यांच्या आवाजामुळे एकेवेळी त्यांना काम मिळालं नव्हतं, पण तोच आवाज आज त्यांची ओळख आहे. त्याचमुळे त्यांच्या या प्रवासावरही चित्रपट आल्यास तो पाहायला प्रेक्षक उत्सुक नक्कीच असतील.

अशोक सराफ – मराठीतील अभिनेता अशोक सराफ यांच्यावर आयुष्यावरही अनेकांना चित्रपट पाहायला आवडेल. पडद्यावर विनोदी भूमिका साकारणारे आशोक सराफ खऱ्या आयुष्यात नक्की कसे आहेत, याचे आकर्षण नेहमीच सर्वांना राहिले आहे. केवळ मराठीच नाही, तर बॉलिवूडमध्येही आपली छाप त्यांनी पाडली. त्यामुळे आजही ते अनेकांचे आवडते अभिनेते आहेत. त्यांची अनेक चित्रपटांत अभिनेत्री रंजना देशमुखबरोबरील जोडी प्रचंड गाजली. त्यांचे एकमेकांबरोबर नावही जोडली गेली. पण अशोक सराफ यांचे अभिनेत्री निवेदिता सराफबरोबर लग्न झाले. त्यांना आज एक मुलगा असून तो शेफ आहे. तसेच आजही आशोक सराफ वयाच्या ७५ व्या वर्षीही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.

महेश मांजरेकर –  मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही मोठे नाव असलेले महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार जास्त कोणाला माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलही अनेकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली. दिपा मेहताबरोबर त्यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांना सत्या आणि आश्वमी ही दोन मुलंही झाली, पण दिपाबरोबर घटस्पोट घेतल्यानंतर त्यांनी अभिनेत्री मेधाबरोबर लग्न केले. त्यांनाही सई ही मुलगी असून, मेधा यांना पहिल्या लग्नापासूनही गौरी नावाची एक मुलगी आहे. अशी काहीशी स्टोरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आहे. त्यामुळे त्यांच्यावरील चित्रपट पाहायलाही अनेकांना आवडू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा