Thursday, April 18, 2024

ट्विंकल खन्नापासून ते साहिल खानपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींवर लागलाय फ्लॉप कलाकाराचा ठपका

हिंदी चित्रपटसृष्टीतील झगमगाटी जग प्रत्येकालाच खुणावत असते. रातोरात पैसा आणि प्रसिद्धी मिळणार्‍या या क्षेत्रात यायला प्रत्येकजण उत्सुक असतो. अनेक अडचणी, संघर्ष, परिस्थिती यावर मात करत प्रत्येक कलाकार यशाच्या शिखरावर पोहचत असतो. या क्षेत्रात प्रत्येकजण यशस्वी होतोच असे नाही. अनेकजण यामध्ये प्रचंड यशस्वी ठरतात, तर काहीजण मात्र या क्षेत्रात येऊन प्रचंड मेहनत घेऊनही अपयशी होतात.

हिंदी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, दमदार भूमिकाही केल्या मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. याच अपयशामुळे या कलाकारांनी शेवटी दुसर्‍या क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. कोण आहेत हे अपयशी ठरलेले कलाकार चला जाणून घेऊ.

ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)
डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना सारख्या दिग्गज कलाकारांच्या घरी जन्म घेतलेल्या ट्विंकलला लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. सोबतीला सौंदर्याची जोड असूनही तिला अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडता आली नाही. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ट्विंकलने अभिनयाला रामराम ठोकला. या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर ती आता लेखक आणि इंटेरियर डिझायनर म्हणून काम करत आहे. तिने अनेक प्रसिद्ध मासिकेसुद्धा प्रकाशित केली आहेत.

कुमार गौरव (Kumar Gaurav)
साल 2002 मध्ये ‘कांटे’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलेला कुमार गौरव या क्षेत्रात यश मिळवू शकला नाही. कुमार गौरव हा दिग्गज अभिनेता राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. त्याचबरोबर तो सुनील दत्तचा जावई आहे. मात्र चित्रपट क्षेत्रात अपयशी ठरल्यानंतर त्याने मालदीवमध्ये टुरिझम कंपनी सुरू केली आहे.

मंदाकिनी (Mandakini)
‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील मंदाकिनीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जाते. मात्र या नंतर तिला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे तिने 1960मध्ये चित्रपट जगताला रामराम ठोकला. यानंतर तिने आपले योगा ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते.

किम शर्मा (Kim Sharma)
मोहब्बतें सारख्या गाजलेल्या चित्रपटातून किम शर्माने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र तिला या क्षेत्रात आपले नाव कमावता आले नाही. या क्षेत्रात आलेल्या अपयशानंतर तिने लग्न केले. सध्या ती एका मोठ्या स्टुडिओची मालकीण आहे.

साहिल खान (Sahil Khan)
दमदार सुरुवात करूनही हिंदी चित्रपट जगतात अपेक्षित यश न मिळालेल्या कलाकारांच्या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश होतो. 2001 मध्ये आलेल्या ‘स्टाइल’ चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपट क्षेत्रात पाउल ठेवले होते. मात्र त्याला या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळेच त्याने अभिनयाला रामराम ठोकला. सध्या तो गोव्यामध्ये जिम आणि फिटनेस ट्रेनिंग सेंटर चालवत आहे.(actors with flop acting carriar in bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

ट्विंकल खन्नाला वाटते अक्षय कुमारच्या ‘या’ गोष्टीची भिती, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा