Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे निधन; हिंदी सिनेमातही केलंय काम

‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे निधन; हिंदी सिनेमातही केलंय काम

मराठी चित्रपटांमधून सर्वांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करणारे अभिनेते योगेश महाजन (Yogesh Mahajan)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. योगेश महाजन यांच्या अंतिम प्रवासाची माहिती महाजन कुटुंबाने शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘आपल्या प्रिय योगेश महाजन यांचे अचानक निधन झाले हे कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे.’ १९ जानेवारी २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रविराव यांचे निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का आहे.

दिवंगत अभिनेते योगेश महाजन यांची अंतिम यात्रा आज सोमवार, २० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बोरिवली पश्चिम मुंबईतील प्रगती हायस्कूलजवळील गोरारी-२ स्मशानभूमीतून काढण्यात येईल.

अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी पौराणिक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण करणारे अभिनेते योगेश महाजन यांचे रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झाले. योगेश ‘शिवशक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणासाठी उमरगावला होता. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्य ही भूमिका साकारली होती. त्यांच्या अचानक मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या ‘परम सुंदरी’चे शूटिंग सुरू, सेटवरील पहिला फोटो समोर
अभिनेत्री सई ताम्हणकर हीच स्टनिंग लूक व्हायरल; पहा फोटोस

हे देखील वाचा