Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने खूपच दुःखी झालीय आरती सिंग, ‘या’ गोष्टीचा खेद केला व्यक्त

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने खूपच दुःखी झालीय आरती सिंग, ‘या’ गोष्टीचा खेद केला व्यक्त

प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. मृत्यूवेळी तो ४० वर्षांचा होता. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक कलाकार त्याला श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. दरम्यान, सिद्धार्थची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री आरती सिंगने अलीकडेच त्याच्याबद्दल अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

दिलेल्या मुलाखतीत आरतीने सांगितले की, ‘बिग बॉस १३’ शो संपल्यानंतर तिने कधीही सिद्धार्थशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. याबद्दल तिला आज खूप खेद आहे. ती म्हणाली, “माझा विश्वास बसत नाही की सिद्धार्थ आता आपल्यात नाही. मला आता प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, इतर लोकांप्रमाणे मी देखील त्याच्या मृत्यूने खूप प्रभावित झाले आहे.” (actress aarti singh is deeply saddened by the death of siddharth shukla said this big thing)

पुढे बोलताना आरती म्हणाली, “बिग बॉस १३ च्या शेवटच्या दिवशी मी सिद्धार्थशी शेवटचे बोलले. आम्ही दोन वर्षांपासून बोललो नाही आणि मी त्याला फोन करण्याचाही प्रयत्न का केला नाही, याबद्दल मला खेद वाटतो.” आरतीने सांगितले की सिद्धार्थच्या मृत्यूनंतर तिला समजले की, आयुष्य खूप लहान आहे. आरती आणि सिद्धार्थ ‘बिग बॉस’ सीझन १३चा भाग राहिले आहेत. इतकेच नव्हे, तर शोमध्ये त्यांची मैत्री पाहण्यासारखी होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा