Saturday, April 27, 2024

विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही कराल कौतुक

अर्जुन रेड्डी फेम दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हा अभिनेत्यासह मल्टिप्लेक्सचा मालकही बनला आहे. अलीकडेच, त्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती की, त्याने ‘एशियन विजय देवरकोंडा सिनेमा’ नावाचे मल्टीप्लेक्स उभारले आहे. अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. यासह असे सांगण्यात आले की, विजयने हे मल्टीप्लेक्स हैदराबादच्या महबूबनगरमध्ये सुरू केला आहे. अक्किनेनी नागा चैतन्य आणि साई पल्लवी स्टारर चित्रपट त्यात दाखवला जाणारा पहिला चित्रपट असेल, अशी माहिती समोर आली आहे. आता या अभिनेत्याची आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. जी त्याने त्याच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिली आहे.

विजय देवरकोंडाने त्याची आई माधवी देवरकोंडा यांना वाढदिवसाच्या दिवशी खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक अतिशय सुंदर फोटो आणि त्यासोबत एक नोट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने आईला वाढदिवसाची भेट म्हणून आपले नवीन पहिले मल्टीप्लेक्स थिएटर, एशियन विजय देवरकोंडा सिनेमा (AVD) दिले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये विजयची आई त्याच नवीन मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये उभी असलेली दिसत आहे. यासह, अभिनेत्याने एक नोट देखील लिहिली, “मुमूलू वाढदिवसाच्या शुभेच्छा, हे तुमच्यासाठी आहे! #AVD. जर तुम्ही व्यायाम केला आणि निरोगी राहिलात, तर मी अधिक मेहनत करीन आणि तुम्हाला आणखी आठवणी देईन.”

सुपरस्टार विजय देवरकोंडाचे चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लायगर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु असे म्हटले जात आहे की, कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे आणि या कारणास्तव आता टीमला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा