Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अदा शर्माने बप्पी लहिरी यांची केली टिंगल, ‘त्या’ ब्रालेस फोटोमुळे सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ

अदा शर्माने बप्पी लहिरी यांची केली टिंगल, ‘त्या’ ब्रालेस फोटोमुळे सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ

अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा अदा तिच्या विवादास्पद पोस्टमुळे ट्रोल होत असते. आता पुन्हा एकदा अदा शर्माने एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या व्हायरल पोस्टमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर सगळीकडे शोककळा पसरली होती. भारतीय संगीत क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून बप्पी लहरी यांचे नाव घेतले जाते. आपल्या गाण्यांबरोबरच ते गळ्यातल्या सोन्यामुळे विशेष प्रसिद्ध होते. याच बप्पी लहरी यांच्याबद्दल अभिनेत्री अदा शर्माने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

अभिनेत्री अदा शर्मा आपल्या अभिनयासाठी आणि बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या फोटोमध्ये तिने आपला एक ब्लेजर घातलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने गळ्यात आणि हातात सोने घातल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत अदाने दिवंगत गायक बप्पी लहरी यांचा फोटो जोडला आहे. त्यांनी सुद्धा गळ्यात सोने घातले आहे. हा फोटो शेअर करत अदाने आपल्या चाहत्यांना कोणी चांगले सोने घातले आहे? असा प्रश्न केला आहे. म्हणजेच तिने बप्पीदाच्या सोन्याची थट्टा उडवल्याचे दिसत आहे. मात्र अदा शर्माच्या या फोटोवर संतापलेल्या नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

या फोटोवर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यावर एका युजरने “अशा प्रकारची तुलना करताना तुला लाज वाटली पाहिजे” अशा कडक शब्दात टीका केली आहे. तर आणखी एकाने “अशा चांगल्या व्यक्तिमत्वाची चेष्टा करताना काहीच कसे वाटत नाही” असे म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे. तर दुसर्‍या युजरने “तुम्ही स्वतःची तुलना अशा व्यक्तिसोबत करताय ज्यांनी सोने आणि गॉगल घालणे सुरू केले आणि तीच सगळीकडे फॅशन झाली” असे म्हणत अदाला तिची जागा दाखवून दिली आहे. या चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियाने तिच्या फोटोवर खूप कमेन्ट येत आहेत.

तत्पूर्वी अदा शर्मा याआधी विद्युत जामवालसोबत ‘कमांडो ३’ चित्रपटात झळकली होती. त्याचबरोबर ती ‘पती पत्नी और वो’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध असून तिचे इंस्टाग्रामवर तब्बल ६ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा