×

Oops Moment | यामी गौतमने घातला स्टायलिश आऊटफिट, पण उघड्या जॅकेटमुळे झाली सगळी पंचायत!

नुकताच यामी गौतमचा (Yami Gautam) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील यामी गौतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती स्टाईल डिवा देखील आहे. तिचे लूक सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. पण स्टायलिश असणंही कधी-कधी महागात पडतं. या अभिनेत्रीसोबतही असंच काहीसं घडलं आहे. जेव्हा तिने जॅकेट घातले होते आणि त्याची चैन उघडी होती, तेव्हा अभिनेत्रीचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.

जॅकेटने परेशान झाली यामी
यामी गौतमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने फिकट पिवळ्या रंगाचा पॅन्ट सूट घातला होता. अभिनेत्रीने पँटसोबत जॅकेट घातले होते, जिची चैनल उघडी होती आणि या उघडलेल्या चैनमुळे ती वैतागलेली दिसली. यामी कॅमेरासमोर पुन्हा पुन्हा तिचं जॅकेट ठीक करताना दिसली. (yami gautam oops moment actress was in trouble with open jacket video gone viral)

रॅम्प वॉक करताना पडता पडता वाचली
यामी गौतमचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालताना दिसली. यावेळी अभिनेत्रीने खूप सुंदर पोशाख घातला होता. पण या आउटफिटमुळेच ती पडता पडता वाचली. २०१९ लॅक्मे फॅशन वीकमध्ये यामी फॅशन डिझायनर्स गौरी आणि नैनिकासाठी शोस्टॉपर बनली. यादरम्यान जड ड्रेस आणि उंच टाचांमुळे रॅम्पवर यामीचे संतुलन बिघडले. यानंतर तिने स्वत:ला सांभाळले आणि अतिशय सुंदर स्मितहास्य करत रॅम्प वॉक केला. तिचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यामी गौतमचे चित्रपट
यामी गौतमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काही दिवसांत अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये ‘दसवी’, ‘OMG 2’ सारख्या मोठ्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. ‘दसवी’ चित्रपटात अभिनेत्री अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याचबरोबर यामी ‘OMG 2’ मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. ‘OMG 2’ हा ‘OMG’ चित्रपटाचा सीक्वल आहे, ज्यामध्ये अभिनेता परेश रावल मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्रीच्या या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

Latest Post